नवरात्र झाली की घराघरात दिवाळीची लगबग सुरू होते.
पण ह्यावेळी आमच्याकडे थोडा आराम होता.कारण दोनच वर्षांपूर्वी लग्न झालेल्या आमच्या लेकानी बायकोबरोबर दिवाळी म्हैसूरला करायची ठरवली होती.त्यामुळे ऐन दिवाळीत आम्ही दोघेच होतो.
पार्ल्यातच सासर असलेल्या लेकीकडे नणदेचा दिवाळसण होता.त्यामुळे " ह्या दिवाळीत मी खूप बिझी आहे तेव्हा तुम्हीच माझ्याकडे जमेल तेव्हा या".अस सांगून ती मोकळी झाली होती.ह्या पिढीच एक बरं आहे मनात येतं ते बोलून मोकळे होतात.
" हे बघ,तू धावपळीत असशील तेव्हा आम्ही तुझ्याकडे जमेल तशी चक्कर मारून जाऊ.तुम्ही मात्र सर्वजण दिवाळीनंतरच्या रविवारी जेवायला या. तोपर्यंत दादा पण आला असेल"असं मी पण तिला कळवून टाकलं.
ह्यांनी मला "आपण दोघेच आहोत तर उगीच फराळाचं नको करत बसू.नेवैद्यापुरतं विकत आणुया"अस सांगून खूष केलं होतं.लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी होती की मला फराळाचा घाट घालायचा नव्हता.
आणि अचानक ह्यांच्या चुलत भावाचा कणकवलीहून फोन आला."दादा, तुम्ही दोघे दिवाळीत इथे येऊ शकाल का? आम्ही घरातल्या सगळ्यांनी दिवाळीत गोव्याला हिच्या माहेरी जायचं ठरवलय तशी गाडी देखील ठरवलीयआणि बाबांना सांभाळायला ठेवलेल्या सामंताना खूप ताप आल्यामुळें हाॅस्पिटलमध्ये ठेवलंय! तुम्ही आलात तर आम्हाला जाता येईल.जरा कळवाल का?
वडिलांच्या मृत्यूनंतर हे कणकवलीत काकांकडेच लहानाचे मोठे झाले असल्यामुळे ते नाही म्हणणं शक्यच नव्हतं.आणि काकांवर त्यांच खूप प्रेम होत.
"तू येणार का? ह्यांनी विचारलं.मला जायची इच्छा कमी होती त्यामुळे मी हळूच विचारलं"नाही आले तर चालेल का?
"अगदी चालेल,आपला लेक नाहीय त्यामुळे ड्रायव्हर, गाडी आहेच ती घेऊन जातो!बरोबर सोबतीला बर्व्याला नेतो.वहिनी गेल्यापासून फार एकटा झालाय.बर्वे ह्यांचा अगदी जवळचा मित्र! सहा महिन्यांपूर्वी त्यांची बायको गेल्यामुळे ते फार एकटे झाले होते.आणि एकुलता एक मुलगा अमेरिकेत रहात असल्यामुळे लादलेल्या एकटेपणाशी जुळवून घेत होते.त्यांना दिवाळीच्या दिवसात गावाला न्यायची ह्यांची कल्पना मला फार आवडली.
मला पण आयुष्यात पहिल्यांदाच अशी मनसोक्त, मनाप्रमाणे दिवाळी साजरी करता येणार होती.
"मी नक्की येतोय.तुम्ही निघा" असा भावाला फोन करून हे धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळीच निघाले.बर्वेकाकांचा उत्साह, आनंद डोळ्यात मावत नव्हता.
भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी येतोय असं म्हणून ती दोघं निघाली आणि मी लगेच नंदीनीला फोन लावला.
नंदिनी,माझी सख्खी मामेबहीण! व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या नंदिनीचा अंधेरीला दवाखाना होता.दुर्दैवानी तरूणपणीच विधवा झालेली ती एकटीच रहात होती.व्यवसाय, त्याबद्दलचा अभ्यास, लिखाण ह्यात तिनी स्वत:ला छान व्यग्र ठेवलं होतं.
नंदिनी माझ्या बहिणीपेक्षा मैत्रिण ज्यास्त होती.त्यामुळे माझा फोन बघितल्यावर तिने"ऐन दिवाळीत फोन?स्वच्छता,फराळ,येणजाण, मुलं ह्यात बुडालेल्या बाईसाहेबांना रिकामटेकड्या लोकांची कशी आठवण झाली?
ए, चेष्टा पूरे! मी हसून बोलले खरी पण तिच खरंच होतं.लग्न झाल्यापासून मी संसारात सतत गुरफटलेलीच होते.लग्न झाल तेव्हा सासुबाई,एक घटस्फोटीत नणंद, दोन उपवर नणंदा! इतक्याजणांच कुटुंब होतं.दोन्ही नणंदांची लग्नं होईपर्यंत आमचापण संसार वाढला.मुलांच करण्यात आणि सगळ्या कुटुंबाचे व्यवहार सांभाळता सांभाळता पस्तिस वर्ष कधी गेली कळलीच नाहीत.
"हे बघ नंदिनी,ह्या वर्षी पहिल्यांदाच मी दिवाळीत एकटीच आहे.तेव्हा पुढचे चार दिवस तू माझ्या बरोबर असणार आहेस! मला हे मिळालेलं स्वातंत्र्य तुझ्या सोबतीने अविस्मरणीय करायचंय."मी उत्साहाने बोलत होते पण नंदिनी काहीच बोलत नव्हती."काय ग,तू आहेस ना इथे की काही कार्यक्रम आहे तुझा! मी थोडंसं चाचरत विचारलं.
"नाही माझा काही कार्यक्रम नाही.पण थोडंसं भरून आलं. आज ह्यांना जाऊन इतकी वर्ष झाली पण तीन भाऊ,दिर, नणंदा कोणालाही मी दिवाळीत एकटी आहे ह्याची जाणीव सुध्दा नसते.पुण्यात रहाणारे दोन्ही भाऊ पाळीपाळीने भाऊबीजेला येऊन जातात.तू बोलल्यावर पहिलं मनात आलं की पुण्याला कळवून टाकायचं ह्यावर्षी नका येऊ मी बिझी आहे."नंदिनी बोलत होती आणि मला वाटल की बरं झालं मी हिला बोलावलं.
बोल काय करायचं? नंदिनी
"मला केंव्हापासून दिवाळी पहाटचा कार्यक्रम एन्जाॅय करायचाय, ह्यांना गाण्याची आवड नाही त्यामुळे खूप इच्छा असूनही कधी जमलच नाही!मी
डन्! मी पार्ल्यातलीच तिकीटं काढते आणि गाडी घेऊन तुला घ्यायला येते."उत्तम प्लॅनिंग नंदिनीचा स्वभावच होता.""आता ऐक, कार्यक्रमानंतर मी तुला मस्त हाॅटेलमध्ये जेवण देणार आणि आपण माझ्या घरी रहाणार! दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या गाडीने आपण दोघी माझ्या आईकडे जाऊया.
"मामी कडे,चौलला? मी आनंदाने अक्षरशः किचाळले.अग हे मला कसं सुचलं नाही?
पण पाडव्याच्या रात्री मात्र परत यायचं बर! कारण भाऊबीजेला मी वहिनीला बोलावलय.दादाच्या आजारपणामुळे गेली चार पाच वर्ष ती कुठेच गेली नाहीय. मी ह्यावेळी तिच्या सुनेला सांगितलय एक दिवस सांभाळ दादाला, वहिनीला मी संध्याकाळपर्यंत पाठवेन.
लग्नाच्या आधी आम्ही दिवाळीला नेहमी चौलला आजीकडेच जायचो.जाम धमाल यायची.नंदिनी तीन भावांची एकुलती एक बहिण!आता एक भाऊ अमेरिकेत आणि दोन पुण्यात रहातात.मामी एकटीच चौलला रहात होती.
दिवाळी पहाट, मस्त जेवण, गप्पा दिवस कधी संपला कळलच नाही.दुसर्या दिवशी पहाटे उठून आम्ही सकाळी दहा पर्यंत चौलला पोचलो.
आम्हाला दोघींना बघून मामीच्या डोळ्यातून अक्षरशः आनंदाचे अश्रू आले.तिला काय करू नि काय नको कळतच नव्हतं. मी पण मामीची लाडकी होते त्यामुळे भाकरतुकडा ओवाळताना तिच्या डोळ्यातल आनंदाच चांदणे अंगणभर पसरलं.
मनात आलं अचानक आलेल्या माझ्या जगण्यातला एकटेपणा घालवताना मी माझ्या जवळच्या कितीजणांना सहवासातून आनंद देऊ शकतेय.
दुपारच मोदकांच जेवण झाल्यावर मस्त ताणून दिली.
रात्री नंदिनीनी समुद्रावर जायचं ठरवलं कारण दुसऱ्या दिवशी आम्ही आलो म्हणून मामींनी गावातल्या बायकांच भजन ठेवले होते.
समुद्रकिनार्यावर चालतच जायचं ठरल्यावर मामीच सुरू झालं"ज्यास्त लांब जाऊ नका? अंधार आहे ना!
आई,आता आम्ही म्हातार्या झालो नको काळजी करू."नंदिनीनी हसून सांगितलं.
किनाऱ्याच्या दिशेनी चालायला लागल्यावर नंदिनी म्हणाली" समुद्र खर म्हणजे एकट्याने अनुभवायची जागा आहे.लाटांच किनार्यावर येऊन परतणं, आणि परतताना आपल्या पायाखालची वाळू सरकणं, प्रत्येक लाटेचा स्वतंत्र आवाज,स्वतंत्र रुप तरीही सगळ्या एकत्र किनार्यावर भेटून परतणार! ती बोलत होती पण मी मात्र ते काळं निळं आभाळ,त्यात लूकलूकणार्या चांदण्या बघून हरखून गेले होते.मनात आलं"प्रत्येकाला दिसणारं,जाणवणारं आभाळ वेगळ असू शकतं.मला तरी आत्ता ते एकटं वाटत होतं.
न बोलता हवेतला गारवा, आजूबाजूचं चैतन्य अनुभवतच आम्ही समुद्रावर पोचलो.दिवाळीमुळे बीचवर तुरळक गर्दी होती.समुद्राची गाज ऐकत वाळूत बसलो. समोर क्षितीजापर्यंत पसरलेल्या समुद्राकडे बघत असताना इतकं शांत वाटतं होतं आणि आम्ही दोघी काही न बोलता खूप काही बोलत होतो.
मामी कडून निघताना"अग बायांनो, तीन दिवसांत तुम्ही मला पुढच्या तीनशे दिवसांच्या आठवणी दिल्यात!ह्या मामीच्या शब्दानी गहिवरून आलं.मी पण आयुष्यभराच्या आठवणी घेऊन परतत होते.
भाऊबीजेचा दिवस वहिनीसाठी होता.जाताना ती म्हणाली"अग,आजारी असले तरी हे आहेत, सुनमुलगा आहेत, नातवंड आहेत पण इतक्या भरलेल्या घरांत मला एकटं वाटायचं पण आजच्या दिवसाची उर्जा मला पुन्हा नवी उमेद देऊन गेली".
रात्री एकटी खिडकीत उभी असताना सहज वरती आभाळाकडे बघितलं आणि जाणवलं"अरे, माझ्या खिडकीतून दिसणारं माझं आभाळ चांदण्यानी गच्च भरलेलं आहे.
ललिता छेडा

No comments:
Post a Comment