माझी आणि मानसीची ओळख ट्रेन मधली आणि!ट्रेनमधल्या प्रवासात होणारी मैत्री कधी कधी खूप घनिष्ट होऊन जाते असा बहूतेकांचा अनुभव असतो.आमच्या दोघींचं ही तसंच झालं.
पहिल्यांदा मानसी भेटली तेव्हा ट्रेनमध्ये माझ्या समोरच्या सीटवर बसलेली होती.आणि तिच्या हातातल्या कॅमेर्यातले फोटो बघत होती.अचानक दाराशी उभ्या असलेल्या दोघींचं काही तरी कारणाने भांडण सुरू झालं.दोघी एकेमेकींबरोबरच होत्या.विषय कळला नाही पण आवाज जोरात येऊ लागला.हिनी त्यांच्या नकळत पटकन त्यांचा फोटो काढला.आणि हसून मला दाखवला.काय परफेक्ट भांडणाचा मुड पकडला होता! मी मस्त अशी खूण केली.ती आपणहून बोलू लागली "मी रेल्वे प्रवासावर एक फोटोशुट करतेय मला एक छान पोझचा फोटो मिळाला".मग काय सी.एस.टी.येईपर्यंत गप्पा सुरू झाल्या. नांव मानसी शर्मा आणि व्यवसायानी ती कोलाज आर्टीस्ट होती.विविध प्रकारचे कोलाज करत होती.फोटो, फॅब्रिक आणि बरंच काही! ती तशी तिशीची वाटत होती आणि मी तीन वर्षांत निवृत्त होणार म्हणजेच तिच्या वयाच्या दुप्पट! पण त्या तासात आमचं चांगलच जुळलं.खूप गप्पा झाल्या.मी सहज तिला विचारलं "तू मराठी इतकं छान कसं बोलतेस?"माझी मम्मी मराठी आहे."तिने हसून सांगितलं." लेखिका,कवियत्री राधा शर्मा"माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत 'माझी मम्मा' तिनी उत्तर दिलं.अरे वा! मला त्यांचे विचार फार आवडतात.मला भेटायला आवडेल."नक्की"मानसी बोलता बोलता उठली.स्टेशन आलं होतं.
स्टेशनवर उतरल्यावर एक मध्यमवयीन मुलगा आमच्याकडे आला."हा राघव माझा फ्रेन्ड,फिलाॅसाॅफर,गाईड तिने हसून ओळख करून दिली.
"चलो दीदी बाय"मानसीनी निरोप घेतला.मला दीदी फार आवडलं.नाहीतर आपली मराठी मुलगी काकू,आजी, मावशी म्हणाली असती.मला तरूण झाल्यासारखं वाटलं.
मी रहायला दादरला आणि ऑफिस फौंटनला! त्यामुळे रोजचाच ट्रेनचा प्रवास कधी मानसी कधी राघव मला भेटू लागले.
त्यानंतर आठएक दिवसांनी आॅफीस सुटायच्या वेळी ती दोघं तिथं आली आणि चलो दीदी माझ्या घरी जाऊया, तुम्हाला मम्मीला भेटायचं आहे ना?राघव गाडी लेके आया है"मानसीनी जवळजवळ ओढून नेलं."अग माझा दिवसभराचा कसा अवतार आहे! मी केविलवाणा प्रयत्न केला.
गाडीत बसल्यावर "आता आपण सायनला आमच्या स्टुडीओवर जाणार आहोत.तिथे तुम्ही फ्रेश व्हा.तोपर्यंत मानसी तिच तिच्या घरी घेऊन जायचं सामान पॅक करेल! नंतर आपण मानसीच्या घरी विक्रोळीला जाऊया. चालेल ना"राघवनी गाडी सुरू करून सर्व कार्यक्रम सांगितला.
त्यांचा स्टुडिओ म्हणजे सायन मधल्या एका बिल्डींगच्या तळमजल्यावर टू बेडरूम चा ब्लाॅक होता.एका बेडरूममध्ये चित्रकार मानसीचा पसारा होता आणि दुसरी व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या राघवची डार्क रुम होती.आम्ही दोघी आमची काम करेपर्यंत राघवनी मस्त चहा करून आणला.
सायनहून निघल्यावर गाडी मानसीनी चालवायला घेतली. मी पुढे बसले आणि राघव मागे बसून लॅपटॉप वर काम करायला लागला.
"दीदी,अंकल कुठे काम करतात?" मानसीने अगदी सहज विचारलं.
"वो एक बड़ी फाॅरेन कंपनीमे एम.डी.है। मी उगीचच हिंदीत बोलले.
राघवचा मागून हसण्याचा आवाज आला."दोन मराठी माणसं असताना हिंदी का? दीदी म्हटल्यामुळे असेल बहुतेक!राघव बोलला आणि आम्ही सगळे हसलो.
"बरं बाबा,तुमचे अंकल साॅफ्टवेअर कंपनीत मोठ्या पोस्टवर आहेत. त्यामुळे वर्षातले सहाआठ महिने कामानिमित्त देशांत किंवा देशाबाहेर फिरतीवर असतात. मी मधून मधून त्यांच्या बरोबर जाते.मला दोन मुली आहेत.एकीच लग्न झालय आणि ती बंगलोरला असते धाकटी शिक्षणासाठी नुकतीच लंडनला गेलीय.त्यामुळे सध्यातरी हिंदू काॅलनीतल्या आमच्या घरी अस्मादिक एकट्याच असतात.मी एका प्रायव्हेट कंपनीत कामाला आहे.आणि अजून तीन वर्षांनी निवृत्ती घेणार! माझ्या एका दमात सगळं सांगण्यामुळे दोघेही खूप हसायला लागले.
"हसू नका,आता तुमची ओळख द्या"मी लटक्या रागात म्हटलं.
"ओ.के.मी राघव! मानसी आणि मी जे.जे.चे पदवीधर आहोत.जे.जे.पासूनच आमची मैत्री जुळली. मी आईबरोबर कल्याणला रहातो.लहान असतानाच वडिल गेले.आईनी कष्टानं मला शिकवलं.कॅमेरा माझं पॅशन आहे. पण कमाईसाठी मोठ्या मोठ्या लग्नांच्या फोटो आॅर्डर घेतो.छोट्या फिल्मस् बनवतो.बस् this is Raghav!
बोलता बोलता घर आलं होतं.तीनचार बिल्डींगच्या सोसायटीत मानसीच तळमजल्यावर घर होतं.घरांत प्रवेश केल्यावर घर प्रेमात पडावं इतकं नीटनेटकं होतं.
"या" फिक्या निळ्या रंगावर छोटी आॅरेंज रंगाची फुलं असलेल्या,सलवार कमीज घातलेल्या, प्रसन्न चेहऱ्याच्या राधाजींनी आमचं स्वागत केलं.मानसीचे पापाजी आणि मोठा भाऊ पण तिथेच बसले होते."अमित,दीदीके मिस्टर साॅफ्टवेअरमे हैं"मानसीने भावाला सांगितलं."क्या नाम है उनका?पापानी विचारलं."सुहास थत्ते"मी बोलले आणि अमित एकदम म्हणाला" बहोत नाम है उनका मुझे उनसे कबसे मिलना है"तो साॅफ्टवेअर इंजिनिअर होता.मी लगेच त्यासर्वांना ह्या महिनाअखेर हे येतील तेव्हा जेवायलाच या अस निमंत्रण दिलं.आणि राघवला म्हटलं"तू पण त्यादिवशी आईला घेऊन ये."नक्कीच, कारण माझं आडनाव पण आहे 'थत्ते' त्यामुळे मी आता हक्कानी येणार"राघव बोलल्यावर मला योगायोगाची कमाल वाटली.ओळखीच एक आवर्तन पूर्ण झालं होतं.
आमच्या घराच्या पार्टीत राघवनी चिक्कार फोटो काढले.त्याच छानस कोलाज माझ्या पॅसेजमध्ये लागलं.
नंतरची तीन वर्षे माझ्या साठी धमाल होती.त्या दोघांबरोबर मी न बघितलेली मुंबई बघितली.मला बरोबर घेतलं की घरातून पण परवानगी! आणि ती दोघंही वागायला खूपच डिसेंट होती. माझ्या मुलीकडे बंगलोरला ही दोघं बरोबर, अलिबागला राघवच्या आजीकडे आम्ही तिघे एकत्र! फोटोंसाठी, चित्रांसाठी मुंबई आणि जवळच्या सर्व समुद्राना भेटी! आणि महत्वाचं म्हणजे मुली आणि हे खूष माझी "एकटं वाटतंयची"कटकट बंद झाली होती.धाकटीनी तर नांव ठेवलं होतं"मम्मीचा कोलाज"
त्यांच्याशी गप्पा मारताना समजलं "मानसीचं वडिलांनी ठरवलेलं पंजाबी मुलाशी लग्न त्यांच्या सततच्या मागण्यांमुळे मोडलं.त्या मंडळींना लग्न मोडून धडा शिकविण्यात राधाजींनी खूप पुढाकार घेतला होता.नंतर मानसी एका मराठी मुलाच्या प्रेमात पडली पण त्या मुलाने ऐनवेळी हिम्मत न दाखवता आईनं सांगितलेल्या मुलीशी लग्न केलं.आणि ह्या सगळ्याचा एकमेव साक्षीदार राघव! ज्याच हिच्यावर खरं प्रेम.
आणि आता त्या दोघांचं लग्न मी जमवावं म्हणून दोन्ही कुटुंब माझ्याकडे आशेने बघत होती.सर्वांच्या प्रयत्नानी आमच्या घरात सगळे जमलेले असताना अचानक राघवनी मानसीला गुलाब देऊन मागणी घातली आणि महत्त्वाचं म्हणजे मानसीने होकार दिला.दोन अनुभवांमुळे ती लग्नाला नाहीच म्हणत होती.
मी पण निवृत्त झाले होते.महिन्याभरांनी ह्यांच्या बरोबर परदेशात फिरणार होते.येताजाता लेकीकडे लंडनला रहाणार होते.मी तीन साडेतीन वर्षाची मोठी सुट्टी घेतली होती.त्यामुळे लग्न लवकर करायच ठरलं.
इतकं सगळं छान चाललेलं पण कल्पना ही करू शकणार नाही असं दृष्टावलं! राघवचा अॅक्सिडंट झाला आणि-----
कोणाची समजूत कोणी काढायची.दोन्ही घरातल्या दु:खाला सीमाच नव्हती. मी पण अक्षरशः हादरले होते.अस घडू शकतं विश्र्वासच बसत नव्हता.पण माझ्या मदतीसाठी आणि लग्नासाठी आलेल्या ह्यांनी सर्वांना कमालीचं समजावलं सगळी परिस्थिती शांतपणे हाताळली.आमच जाणं पंधरा दिवसांनी लांबवल.
खूप काही तरी गमवून विमनस्क मनस्थितीत मी मुंबई सोडली.
पण काळासारख औषध नाही.त्यामुळे दु:ख हळूहळू कमी होत गेलं. मानसीशी फोन, मेसेज, Whatsapp,वर कनेक्टेड होते.हल्ली तिचे फोटो तान्ह्या बाळा बरोबर असायचे.स्टेटस् पण छोटीच्या फोटोंचा असायचा.कोण आहे विचारलं की भारतात या मग कळेल अस म्हणायची.तिनी फक्त "मी स्टुडिओवर रहाते" हे मात्र कळवलं होतं.
जवळपास चार वर्षानी मी परतले.आल्यावर दुसऱ्याच दिवशी मानसीला भेटायला स्टुडिओवर गेले.बाहेर एक सुंदर बोर्ड होता.
बेल वाजवली.
जिया
मानसी शर्मा
नर्मदा थत्ते
ह्यांचा
'रामा' स्टुडिओ
बोर्ड वाचून डोळे भरून आले.दारात कडेवर छोटीला घेऊन मानसी उभी होती."या"मला बघून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता."खूप मिस केलं तुम्हाला दीदी!"मी पण "दोघींनी अक्षरशः मिठी मारली.थोडावेळ मनसोक्त रडून घेतलं.
"मी जियाला दत्तक घेतलय.माझं आणि राघवच पहिली मुलगी दत्तक घ्यायची असं ठरलंच होतं."मानसी हळूच बोलली."आणि राघवच्या आई इथे माझ्या बरोबर रहातात" मधून मधून मम्मा पापाजी पण येतात.
दु:ख विसरायला मानसीतल्या चित्रकाराने तिच्या आयुष्याचा कॅनव्हास सुंदर कोलाज करून रंगवला होता.तिच्या पावलापुरता प्रकाश उजळला होता.
ललिता छेडा

No comments:
Post a Comment