सकाळी हाॅस्पिटलमध्ये आल्यावर डाॅ.भास्कर रिसेप्शनवर कोणीतरी देऊन गेलेल्या चिठ्ठीमुळे गंभीर झाले."उद्या संध्याकाळी साडेसात नंतर तुम्हा सर्वांना भेटायला घरी येतेय"शिल्पा.
जवळजवळ तीसबत्तीस वर्षांनी हे नाव ह्या चिठ्ठीमुळे पुन्हा त्यांच्या आयुष्यात आलं होतं.आता ही चिठ्ठी अक्षयला त्यांच्या लेकाला दाखवायची की नाही ह्या विचारानी त्यांना अस्वस्थ वाटलं.पण "ती घरी येणार" असं लिहीतेय म्हणजे घरात सर्वांनाच सांगायला हवं.
आज अक्षयला दोन ऑपरेशन्स होती म्हणजे तो दुपारपर्यंत बिझी असेल.नंतर बोलू असा विचार करून त्यांनी हाॅस्पिटलची रोजची कामं आटपली.अक्षयनी हाॅस्पिटल सांभाळायला सुरवात केल्यापासून ते निवृत्तच झाले होते.आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा तिथे दवाखाना होता पण अक्षय सर्जन झाल्यावर तिथेच त्याने मोठ हाॅस्पिटल केलं होतं. ते रोज फक्त त्यांचे पेशंट तपासत त्याशिवाय अक्षयची बायको सुचेता पॅथाॅलाॅजिस्ट असल्यामुळे तिथेच तिची लॅबही होती.लंच बहुतेक तिघेही घरून टिफीन आला की हाॅस्पिटलमधेच घेत असत.इतक्या छान चाललेल्या आयुष्यात आता त्या चिठ्ठीमुळे वादळ आलं होतं.
भास्कर आपल्या केबिनमध्ये आले आणि रिसेप्शनवर फोन करून"अक्षय फ्री झाला की त्याला आणि सुचेताला आत पाठवा"असा निरोप ठेवला.त्यांचे पेशंटही संपले होते.सकाळपासून त्या चिठ्ठीमुळे त्यांना प्रचंड अस्वस्थता जाणवत होती.कोणाशी काही बोलताही येत नव्हतं."का येतेय ही?ह्या प्रश्नानी त्यांना भंडावून सोडलं होतं.मन सारख भूतकाळात जात होतं.जे आपण पूर्णपणे विसरलो आहे असं समजत होतो तेच सारख आठवत होतं.
भास्कर सारख्या अनाथ मुलांला दत्तक घेऊन सुप्रसिद्ध उद्योजक आबासाहेब इनामदारांनी त्याच्यावर खरं म्हणजे उपकारच केले होते.अनाथआश्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राह्यलेल्या आबांना भास्करच्या डोळ्यातलं बुध्दीच तेज दिसल.मुलबाळ नसलेल्या आबांनी आपल्या पत्नीला विचारून भास्करला दत्तक घेतलं.आजूबाजूच्यांनी,नातेवाईकां नी त्यांना असं अनाथ मुलांला दत्तक घेऊ नये म्हणून खूप समजावलं पण ते आपल्या निर्णयावर ठाम होते.आणि भास्करनी पण त्यांचा निर्णय यथार्थ ठरवला.आबांच्या इच्छेनुसार तो डाॅक्टर झाला.माईंच म्हणजेच आबांच्या पत्नीच तर भास्करवर सख्ख्या मुलापेक्षा जास्त प्रेम होतं.दवाखाना काढतानाच आबांनी भास्कर कडून वचन घेतले होतं.'तू तुझ्या डाॅक्टर असण्याचा ज्यास्तीतज्यास्त फायदा गरीब आणि गरजू लोकांना करून द्यायचा'
डाॅ.भास्करनी पण तो शब्द आयुष्यभर पाळला.
त्यांच्या आयुष्यात शिल्पा आली आणि भास्करच आयुष्यच बदलून गेलं.आबांसारख्याच एका मोठ्या उद्योगपतींची ती एकुलती एक मुलगी! एका कार्यक्रमात त्यांची ओळख झाली.शिल्पाच्या पुढाकारानेच त्यांच लग्न ठरलं.माई तर नुसत्या हरखून गेल्या होत्या.इतकी सुंदर मोठ्या घर कळवणार.ची लाडकी लेक सून म्हणून येणार होती.आबा मात्र एकदा म्हणाले"हिच्या वडीलांना पैशाची खूप घमेंड आहे.हिला तशी नसावी म्हणजे झालं."भास्कर लगेच म्हणाला होता की"तुम्ही नाही म्हणत असाल तर आपण इथेच थांबूया.""नाही रे, मला तुझ्या डोळ्यात तिच्या वरच प्रेम दिसतंय.मी फक्त शक्यता बोललो"आबांनी विषय संपवला होता.पण अशा शक्यता बहूतेक खर्या ठरतात.शिल्पा भास्करच्या घरात एखाद्या पाहूण्यासारखी रहात होती.आबांना आणि भास्करला संगीताची आवड आणि हिला गाणं शब्दांशी वैर,माईंना स्वैपाकाची हौस तर ही स्वैपाकाला बाई आहे म्हणून तिकडे फिरकणारच नाही.
लग्नानंतर दोनच महिन्यांत तिला दिवस गेले. माईंना,भास्करला खूप आनंद झाला आणि त्यांना वाटल आता ही ह्या घरची होईल.पण तिनी अॅबाॅरशनचा हट्ट धरला.तिला येवढ्यात ही जबाबदारी नको होती.माईंनी,तिच्या आईनं खूप समजावलं तेव्हा ती कशीबशी तयार झाली.अक्षयच्या जन्मानंतर तर तिचा आडमुठेपणा जास्तच झाला. शिल्पाला आबांचा बिझनेस स्वत:च्या नांवावर करून हवा होता. किंबहुना लग्नामागचा हेतूच तो होता आणि आबा तिच्या ह्या इच्छेकडे पूर्ण दुर्लक्ष करत होते.त्याउलट आबांनी स्वैपाकाच्या काकूंना तुमच्या मूलीला मी इंजिनिअर करेन आणि व्यवसायाची जबाबदारी तिला घ्यावी लागेल असं म्हटल्यावर तर तिचे वाद,भांडणं अधिकच वाढली.भास्करला आबा माईंसाठी खूप वाईट वाटायचं.
अक्षयचा आठवा वाढदिवस होता.शिल्पाला तो पंचतारांकित हॉटेलमध्ये करायचा होता.आबा अगदी सहज म्हणाले"उगीच येवढा खर्च करण्यापेक्षा आपल्या बंगल्याच्या गच्चीवर छान पार्टी देऊया" भास्करनी पण त्याला दुजोरा दिला.आणि शिल्पा उसळून म्हणाली"तुम्ही सर्वजण अनाथआश्रम मेंटलिटीतून वर येणारच नाही का? मला कळतच नाहीय मी का रहातेय इथे? आबांनी हताश होऊन भास्करकडे बघितलं."मग तू तूला जिकडे जायचं तिकडे जाऊ शकतेस!भास्करनी शांतपणे उत्तर दिलं.
संतापाने बॅग भरून ती अक्षयला घेऊन घरातून बाहेर पडली.माई तिच्या मागे जायला लागल्या पण आबांनी त्यांना थांबवलं. आणि शिल्पाला "ह्या घराबाहेर पडलात तर परत यायचं नाही.तेव्हा पाऊल उचलताना विचार करा".असं उंच आवाजात सुनावलं.पण ती मागे न बघता निघून गेली.माई गहिवरून"अहो अक्षयला घेऊन गेली ना"काळजी नका करू,ती जास्तीतजास्त आठ दिवस अक्षयला सांभाळेल.आबानी माईंना घरात घेऊन दार बंद केलं.आणि ते म्हणाले तसच घडलं पाचव्या दिवशी ती अक्षयला सोडून गेली.भूतकाळात रमलेल्या भास्करची तन्द्री भंगली जेव्हा अक्षयसुचेता त्यांच्या केबिनमध्ये दार ढकलून आले.
काय झालंय बाबा, रिसेप्शनवर कळलं की कसली तरी चिठ्ठी तुम्हाला आलेय.आणि तुम्ही डिस्टर्ब आहात!अक्षय नी सरळ विषयालाच हात घातला होता.त्यांनी खिशातून चिठ्ठी काढून त्याच्या हातात ठेवली.एक मिनीटच अपसेट झाल्यासारखा भाव त्याच्या चेहऱ्यावर आला पण लगेच शांतपणे "don't worry, मी बघतो काय करायचं ते! असं बोलून सुचेताला जेवून घेऊया अशी खूण केली.भास्करला आबांची आठवण झाली.अगदी त्यांच्या सारखाच वागला होता अक्षय!
दुसऱ्या दिवशी बरोबर साडेसातला बंगल्याची बेल वाजली.भास्कर दरवाजा आड बसला होता.समोरच्या आरशात त्याला दरवाज्यातल दिसत होतं.पण दरवाजातल्या व्यक्तिला तो दिसणार नव्हता.ही कल्पना पण अक्षयचीच होती.
दरवाजात शिल्पा उभी होती.बाॅबकट,जीन्समध्ये खूप स्मार्ट दिसत होती.चेहर्यावरच वय मात्र लपत नव्हतं."डाॅक, नाहीय का? भास्कर च्या अंगावर काटा आला.किती दिवसांनी डॉक हा शब्द ऐकला होता.शिल्पा त्याला हीच हांक मारायची.
"साॅरी, मी डाॅक्टरअक्षय भास्कर इनामदार.आपल काय काम आहे? मॅडम.
"अरे मी तुझी माॅम"शिल्पा आत यायला बघत होती. तिच्याकडे एक खांद्यावर एक हातात अशा दोन बॅगा होत्या.
"अच्छा,मॅडम बत्तीस वर्षांपूर्वी तुम्ही मला ह्याच जागेवर सोडून गेला होतात. त्याची आठवण करून देताय का? साॅरी,पण ते सर्व मी विसरलोय. त्यानंतर माझ्या रडण्याचा आवाज ऐकून बाबा धावत बाहेर आले होते आणि मला उचलून आत घेऊन गेले होते.जाताना फक्त "लंडनला जातेय अक्षयचा व्हिसा पाठवते" येवढंच बोललात.व्हिसाची वाट कधीच बघितली नाही कारण तो येणार नाही याची खात्री होती".अक्षय प्रचंड शांतपणे बोलत होता.
इतक्यात सुचेता पूढे आली."तुझी बायको? शिल्पांनी घाबरत विचारलं.तिला अक्षयचा अॅटिट्युड सहन होत नव्हता.
Yes,sucheta my wife.आणि ही दोन मुलं साहिल, संगिता! अजून काही विचारायचय?
भास्कर कुठे आहे? शिल्पानी चाचरत विचारलं.
ते नाही भेटणार तुम्हाला!अक्षय विषय संपवला होता.
"मी इथे आपल्या घरी परतलेय".शिल्पा हळवी झाल्यासारखी वाटली.
"साॅरी, तुम्ही घरातून गेलात तेव्हा आजोबांनी काय सांगितलं होतं आठवतंय ना? मी खूप लहान होतो पण तरीही मला आठवतंय!"अक्षय बत्तीस वर्षाचा राग व्याजासह वसूल करत होता.आणि आज त्याला अडवायच नाही हे भास्करनी ठरवलच होतं.
आत्ता या वेळी मी कुठे जाऊ? शिल्पा असहाय्य झालेली जाणवत होती.
Oh, अपेक्षित प्रश्न! लंडनमध्ये दोन अयशस्वी लग्न आणि वडिलांच्या मृत्यूनंतर व्यवसायात आलेल्या तोट्यानंतर हेच घडणार होतं.भास्करला वाटलं ह्याला कसं कळल हे सगळं?माई आबांना नेहमी म्हणायची तुम्हाला कसं कळतं घरात बसून?आबा हसून म्हणायचे"माणसं जोडावी लागतात.डोळे उघडे ठेवावे लागतात.
तुमची सोय आमच्या हाॅस्पिटलमध्ये केली आहे. तळमजल्यावर दोन खोल्या आहेत.तिथे राहू शकता!संपत आमचा ड्रायव्हर तुम्हाला सोडून येईल".अक्षय पूर्ण तयारीनिशी बोलत होता."हा इतका कसा आबांसारखा"भास्कर अभिमानाने त्यांच्याकडे बघत होता.
नाईलाजाने शिल्पा वळली होती.ती गाडीत बसल्या बरोबर अक्षयनी दरवाजा बंद केला.
आणि भास्करच्या जवळ येऊन म्हणाला"खूप रूडली वागलो ना?पण आई अशी सोडून गेली की फार भोगावं लागतं मुलांना! आपण दोघे किती एकटे होतो तरीही एकेमेकांसाठी होतो. आणि आपल्या दोघांना आबा होते.
ही मात्र पुढचं आयुष्य आपण आजूबाजूला असून सुद्धा एकटी असेल.
"तुला असं वागताना बघून मला आबांची फार आठवण झाली"भास्कर गहिवरून म्हणाला.
"चला तर मग आजोबांसाठी तुमची आवडती गझल लावूया.
अपनी धूनमे रहता हूं , मैं भी तेरे जैसा हूं!
गुलाम अलींचे स्वर बंगल्यात अलगद पसरले.
ललिता छेडा
जवळजवळ तीसबत्तीस वर्षांनी हे नाव ह्या चिठ्ठीमुळे पुन्हा त्यांच्या आयुष्यात आलं होतं.आता ही चिठ्ठी अक्षयला त्यांच्या लेकाला दाखवायची की नाही ह्या विचारानी त्यांना अस्वस्थ वाटलं.पण "ती घरी येणार" असं लिहीतेय म्हणजे घरात सर्वांनाच सांगायला हवं.
आज अक्षयला दोन ऑपरेशन्स होती म्हणजे तो दुपारपर्यंत बिझी असेल.नंतर बोलू असा विचार करून त्यांनी हाॅस्पिटलची रोजची कामं आटपली.अक्षयनी हाॅस्पिटल सांभाळायला सुरवात केल्यापासून ते निवृत्तच झाले होते.आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा तिथे दवाखाना होता पण अक्षय सर्जन झाल्यावर तिथेच त्याने मोठ हाॅस्पिटल केलं होतं. ते रोज फक्त त्यांचे पेशंट तपासत त्याशिवाय अक्षयची बायको सुचेता पॅथाॅलाॅजिस्ट असल्यामुळे तिथेच तिची लॅबही होती.लंच बहुतेक तिघेही घरून टिफीन आला की हाॅस्पिटलमधेच घेत असत.इतक्या छान चाललेल्या आयुष्यात आता त्या चिठ्ठीमुळे वादळ आलं होतं.
भास्कर आपल्या केबिनमध्ये आले आणि रिसेप्शनवर फोन करून"अक्षय फ्री झाला की त्याला आणि सुचेताला आत पाठवा"असा निरोप ठेवला.त्यांचे पेशंटही संपले होते.सकाळपासून त्या चिठ्ठीमुळे त्यांना प्रचंड अस्वस्थता जाणवत होती.कोणाशी काही बोलताही येत नव्हतं."का येतेय ही?ह्या प्रश्नानी त्यांना भंडावून सोडलं होतं.मन सारख भूतकाळात जात होतं.जे आपण पूर्णपणे विसरलो आहे असं समजत होतो तेच सारख आठवत होतं.
भास्कर सारख्या अनाथ मुलांला दत्तक घेऊन सुप्रसिद्ध उद्योजक आबासाहेब इनामदारांनी त्याच्यावर खरं म्हणजे उपकारच केले होते.अनाथआश्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राह्यलेल्या आबांना भास्करच्या डोळ्यातलं बुध्दीच तेज दिसल.मुलबाळ नसलेल्या आबांनी आपल्या पत्नीला विचारून भास्करला दत्तक घेतलं.आजूबाजूच्यांनी,नातेवाईकां
डाॅ.भास्करनी पण तो शब्द आयुष्यभर पाळला.
त्यांच्या आयुष्यात शिल्पा आली आणि भास्करच आयुष्यच बदलून गेलं.आबांसारख्याच एका मोठ्या उद्योगपतींची ती एकुलती एक मुलगी! एका कार्यक्रमात त्यांची ओळख झाली.शिल्पाच्या पुढाकारानेच त्यांच लग्न ठरलं.माई तर नुसत्या हरखून गेल्या होत्या.इतकी सुंदर मोठ्या घर कळवणार.ची लाडकी लेक सून म्हणून येणार होती.आबा मात्र एकदा म्हणाले"हिच्या वडीलांना पैशाची खूप घमेंड आहे.हिला तशी नसावी म्हणजे झालं."भास्कर लगेच म्हणाला होता की"तुम्ही नाही म्हणत असाल तर आपण इथेच थांबूया.""नाही रे, मला तुझ्या डोळ्यात तिच्या वरच प्रेम दिसतंय.मी फक्त शक्यता बोललो"आबांनी विषय संपवला होता.पण अशा शक्यता बहूतेक खर्या ठरतात.शिल्पा भास्करच्या घरात एखाद्या पाहूण्यासारखी रहात होती.आबांना आणि भास्करला संगीताची आवड आणि हिला गाणं शब्दांशी वैर,माईंना स्वैपाकाची हौस तर ही स्वैपाकाला बाई आहे म्हणून तिकडे फिरकणारच नाही.
लग्नानंतर दोनच महिन्यांत तिला दिवस गेले. माईंना,भास्करला खूप आनंद झाला आणि त्यांना वाटल आता ही ह्या घरची होईल.पण तिनी अॅबाॅरशनचा हट्ट धरला.तिला येवढ्यात ही जबाबदारी नको होती.माईंनी,तिच्या आईनं खूप समजावलं तेव्हा ती कशीबशी तयार झाली.अक्षयच्या जन्मानंतर तर तिचा आडमुठेपणा जास्तच झाला. शिल्पाला आबांचा बिझनेस स्वत:च्या नांवावर करून हवा होता. किंबहुना लग्नामागचा हेतूच तो होता आणि आबा तिच्या ह्या इच्छेकडे पूर्ण दुर्लक्ष करत होते.त्याउलट आबांनी स्वैपाकाच्या काकूंना तुमच्या मूलीला मी इंजिनिअर करेन आणि व्यवसायाची जबाबदारी तिला घ्यावी लागेल असं म्हटल्यावर तर तिचे वाद,भांडणं अधिकच वाढली.भास्करला आबा माईंसाठी खूप वाईट वाटायचं.
अक्षयचा आठवा वाढदिवस होता.शिल्पाला तो पंचतारांकित हॉटेलमध्ये करायचा होता.आबा अगदी सहज म्हणाले"उगीच येवढा खर्च करण्यापेक्षा आपल्या बंगल्याच्या गच्चीवर छान पार्टी देऊया" भास्करनी पण त्याला दुजोरा दिला.आणि शिल्पा उसळून म्हणाली"तुम्ही सर्वजण अनाथआश्रम मेंटलिटीतून वर येणारच नाही का? मला कळतच नाहीय मी का रहातेय इथे? आबांनी हताश होऊन भास्करकडे बघितलं."मग तू तूला जिकडे जायचं तिकडे जाऊ शकतेस!भास्करनी शांतपणे उत्तर दिलं.
संतापाने बॅग भरून ती अक्षयला घेऊन घरातून बाहेर पडली.माई तिच्या मागे जायला लागल्या पण आबांनी त्यांना थांबवलं. आणि शिल्पाला "ह्या घराबाहेर पडलात तर परत यायचं नाही.तेव्हा पाऊल उचलताना विचार करा".असं उंच आवाजात सुनावलं.पण ती मागे न बघता निघून गेली.माई गहिवरून"अहो अक्षयला घेऊन गेली ना"काळजी नका करू,ती जास्तीतजास्त आठ दिवस अक्षयला सांभाळेल.आबानी माईंना घरात घेऊन दार बंद केलं.आणि ते म्हणाले तसच घडलं पाचव्या दिवशी ती अक्षयला सोडून गेली.भूतकाळात रमलेल्या भास्करची तन्द्री भंगली जेव्हा अक्षयसुचेता त्यांच्या केबिनमध्ये दार ढकलून आले.
काय झालंय बाबा, रिसेप्शनवर कळलं की कसली तरी चिठ्ठी तुम्हाला आलेय.आणि तुम्ही डिस्टर्ब आहात!अक्षय नी सरळ विषयालाच हात घातला होता.त्यांनी खिशातून चिठ्ठी काढून त्याच्या हातात ठेवली.एक मिनीटच अपसेट झाल्यासारखा भाव त्याच्या चेहऱ्यावर आला पण लगेच शांतपणे "don't worry, मी बघतो काय करायचं ते! असं बोलून सुचेताला जेवून घेऊया अशी खूण केली.भास्करला आबांची आठवण झाली.अगदी त्यांच्या सारखाच वागला होता अक्षय!
दुसऱ्या दिवशी बरोबर साडेसातला बंगल्याची बेल वाजली.भास्कर दरवाजा आड बसला होता.समोरच्या आरशात त्याला दरवाज्यातल दिसत होतं.पण दरवाजातल्या व्यक्तिला तो दिसणार नव्हता.ही कल्पना पण अक्षयचीच होती.
दरवाजात शिल्पा उभी होती.बाॅबकट,जीन्समध्ये खूप स्मार्ट दिसत होती.चेहर्यावरच वय मात्र लपत नव्हतं."डाॅक, नाहीय का? भास्कर च्या अंगावर काटा आला.किती दिवसांनी डॉक हा शब्द ऐकला होता.शिल्पा त्याला हीच हांक मारायची.
"साॅरी, मी डाॅक्टरअक्षय भास्कर इनामदार.आपल काय काम आहे? मॅडम.
"अरे मी तुझी माॅम"शिल्पा आत यायला बघत होती. तिच्याकडे एक खांद्यावर एक हातात अशा दोन बॅगा होत्या.
"अच्छा,मॅडम बत्तीस वर्षांपूर्वी तुम्ही मला ह्याच जागेवर सोडून गेला होतात. त्याची आठवण करून देताय का? साॅरी,पण ते सर्व मी विसरलोय. त्यानंतर माझ्या रडण्याचा आवाज ऐकून बाबा धावत बाहेर आले होते आणि मला उचलून आत घेऊन गेले होते.जाताना फक्त "लंडनला जातेय अक्षयचा व्हिसा पाठवते" येवढंच बोललात.व्हिसाची वाट कधीच बघितली नाही कारण तो येणार नाही याची खात्री होती".अक्षय प्रचंड शांतपणे बोलत होता.
इतक्यात सुचेता पूढे आली."तुझी बायको? शिल्पांनी घाबरत विचारलं.तिला अक्षयचा अॅटिट्युड सहन होत नव्हता.
Yes,sucheta my wife.आणि ही दोन मुलं साहिल, संगिता! अजून काही विचारायचय?
भास्कर कुठे आहे? शिल्पानी चाचरत विचारलं.
ते नाही भेटणार तुम्हाला!अक्षय विषय संपवला होता.
"मी इथे आपल्या घरी परतलेय".शिल्पा हळवी झाल्यासारखी वाटली.
"साॅरी, तुम्ही घरातून गेलात तेव्हा आजोबांनी काय सांगितलं होतं आठवतंय ना? मी खूप लहान होतो पण तरीही मला आठवतंय!"अक्षय बत्तीस वर्षाचा राग व्याजासह वसूल करत होता.आणि आज त्याला अडवायच नाही हे भास्करनी ठरवलच होतं.
आत्ता या वेळी मी कुठे जाऊ? शिल्पा असहाय्य झालेली जाणवत होती.
Oh, अपेक्षित प्रश्न! लंडनमध्ये दोन अयशस्वी लग्न आणि वडिलांच्या मृत्यूनंतर व्यवसायात आलेल्या तोट्यानंतर हेच घडणार होतं.भास्करला वाटलं ह्याला कसं कळल हे सगळं?माई आबांना नेहमी म्हणायची तुम्हाला कसं कळतं घरात बसून?आबा हसून म्हणायचे"माणसं जोडावी लागतात.डोळे उघडे ठेवावे लागतात.
तुमची सोय आमच्या हाॅस्पिटलमध्ये केली आहे. तळमजल्यावर दोन खोल्या आहेत.तिथे राहू शकता!संपत आमचा ड्रायव्हर तुम्हाला सोडून येईल".अक्षय पूर्ण तयारीनिशी बोलत होता."हा इतका कसा आबांसारखा"भास्कर अभिमानाने त्यांच्याकडे बघत होता.
नाईलाजाने शिल्पा वळली होती.ती गाडीत बसल्या बरोबर अक्षयनी दरवाजा बंद केला.
आणि भास्करच्या जवळ येऊन म्हणाला"खूप रूडली वागलो ना?पण आई अशी सोडून गेली की फार भोगावं लागतं मुलांना! आपण दोघे किती एकटे होतो तरीही एकेमेकांसाठी होतो. आणि आपल्या दोघांना आबा होते.
ही मात्र पुढचं आयुष्य आपण आजूबाजूला असून सुद्धा एकटी असेल.
"तुला असं वागताना बघून मला आबांची फार आठवण झाली"भास्कर गहिवरून म्हणाला.
"चला तर मग आजोबांसाठी तुमची आवडती गझल लावूया.
अपनी धूनमे रहता हूं , मैं भी तेरे जैसा हूं!
गुलाम अलींचे स्वर बंगल्यात अलगद पसरले.
ललिता छेडा

No comments:
Post a Comment