ऑफिसमध्ये प्रेझेंटेशनची गडबड असल्यामुळे रश्मीनी सकाळी मोबाईल सायलेंटवरच ठेवला होता.लंचला जाताना मोबाईल बघितला तेव्हा तिच्या नवऱ्याचे म्हणजेच आशिषचे ४/५मिस काॅल दिसत होते.
"अरे आज त्याच प्रमोशन डिक्लेअर होणार होतं.म्हणून बहुतेक हा फोन लावत असणार रश्मीच्या मनात आलं आणि तिनं लगेच त्याला फोन लावला.
"अग, किती फोन लावतोय,उचलत का नव्हतीस? माझं प्रमोशन झालंय आणि मला दोन वर्षं दुबईला जावं लागेल.आणि हे तुला सांगायचं तर तू फोनच घेत नव्हतीस!
"बोलत का नाहीस? आशिष विचारत होता.
"अरे तू दोन वर्ष नाहीस, एकटेपणाच्या कल्पनेने शब्दच सुचेनासे झालेत."रश्मीला भरून आलं होतं.
"अगं,वर्षात दोनदा फॅमिली येऊ शकते"आशिष खूप खूष होऊन बोलत होता.
तिला जाणवलेला विरह त्याला कळतच नव्हता आणि हळव्या,कवी मनाच्या रश्मीला नक्की माहीत होतं की असाच आहे हा प्रॅक्टिकल,अॅम्बिशियस आणि आपल्या दृष्टीनं 'अरसिक' पण आपण तर त्याच्या ह्याच जिद्दी स्वभावावर भाळलो होतो ना!...रश्मीनी बघितलं तर त्यानं फोन ठेवला होता.
रश्मी खरं म्हणजे रंग संगतींची उत्तम जाण असणारी चित्रकार आणि हळव्या मनाची कवियत्री होती. एका प्रसिद्ध अॅडव्हटायझींग एजन्सीत डिझायनिंग विभागाची प्रमुख होती.घरापासून तिच्या केबिनपर्यंत सगळीकडे तिचा नीटनेटकेपणा आणि सौंदर्याची जाण तिला ओळखणार्या सगळ्यांना माहीत होती.
तिच्या सासूबाईंना तर तिचं खूप कौतुक होतं.नोकरी सांभाळून तिच्या जुळ्या मुलींना सांभाळून ती घराच्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत होती. दोन्ही मुली आठवीत होत्या त्यांची शाळा,क्लास सर्व गोष्टींकडे तिचं बारीक लक्ष असायचं.आणि तिच्या ह्या स्वभावाच कौतुक तिच्या सासूबाईंना खूप होतं.
पण मल्टीनॅशनल कंपनीत इंजिनिअर म्हणून मोठ्या पदावर असलेल्या आशिषला मात्र तिचा हाच नेटकेपणा जाचक वाटायचा.त्याच म्हणणं 'काम करा यश मिळणारच'.त्यासाठी हे रंगसंगती, सौंदर्य, टापटीप ह्याची काही गरज नाही.सुरवातीला रश्मीनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण नंतर मात्र तिनं ह्या विषयावर बोलणंच सोडून दिलं.
आशिषच ध्येय होतं कंपनीच संचालकपद आणि त्यादृष्टीने दुबईला जाणं ही त्या दिशेच पहिलं पाऊल होतं.त्यामुळे रश्मीला जाणवलेला एकटेपणा त्याच्या विचारातही नव्हता.
आज कंपनीतर्फे आशिषला दिलेल्या सेंडॉफ पार्टीत रश्मी खास निमंत्रित होती.आणि त्या पार्टीत रश्मीचा परिचय कंपनीच्या व्हाईस चेअरमन आनंद शर्मा यांच्याशी झाला.
उंचापुरा,देखणा, आनंद पार्टीत आपल्या वागण्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता.त्यानी घातलेला रेड टी शर्ट वर ग्रे ब्लेझर बघून रश्मी मनातल्या मनात त्याला शंभर मार्क देऊन मोकळी झाली होती.
अचानक आशिष आनंदला घेऊन तिच्या जवळ आला.आणि "मीट माय वाईफ रश्मी,शी इज अ कमर्शियल आर्टिस्ट"अशी ओळख करून दिली.
आनंदनी हात पुढे केला आणि तिनं पण नकळत हातात हात दिला.का कुणास ठाऊक पण तो स्पर्श तिला काही तरी वेगळाच जाणवला! हात हातात असतानाच आनंदनी विचारलं"जाॅब करता?" पट्कन हात सोडवून घेत तिनं चमकून त्याच्याकडे बघितलं.
"मला मराठी येतं,जन्म कोल्हापूरचा असल्यामुळे सुरवातीच शिक्षण मराठीतून झालंय."बाकी आयुष्य मुंबईत तेव्हा मराठी इज मस्ट!आनंदच बोलणं कमालीच मृदू होतं.
रश्मीनी थोडक्यात तिच्या जाॅब विषयी सांगितलं.'"व्हेरी गुड, आपल्या कंपनीच्या नवीन प्राॅडक्टसाठी तुमच्या एजन्सीकडे नक्कीच अँप्रोच करू."आनंद बोलत बोलत उठला आणि तिच्या खांद्याला स्पर्श करून'बाय' म्हणून दुसऱ्या कोणाशी तरी बोलू लागला. त्याच्या सेंटचा सुगंध मात्र तिच्या अवतीभवती दरवळत राह्यला.तिच्या मनात आलं"सुगंध कोण आणि कसा लावतं ह्यावर असं दरवळणं अवलंबून असावं बहुतेक"आणि तिच तिलाच ह्या विचारानं हसू आलं."काय बाई,मोठी ऑर्डर मिळतेय म्हणून हसू येतय ना? आशिष जवळ येऊन कानात पुटपुटला.
दुसऱ्या दिवसापासून आशिष जायच्या तयारीला लागला.महिन्याभरात त्याला निघावं लागणार होतं.तस आनंदनी कालच्या पार्टीत त्याच कौतुक करताना जाहीरच केलं होतं.आशिषला पण आता एकटं रहाण्याच टेन्शन यायला लागलं होतं.तरी कंपनीने त्यांची सर्व सोय केलेली होती.त्याच्याबरोबर पुणे,बंगलोर, हैदराबाद मधून पण तीन जणांना पाठवलं होतं.ते तिघेही काहीना काही कारणांमुळे एकटेच होते त्यामुळे त्या सर्वांच्या सोयीसाठी रश्मीनी आशिष बरोबर जावं असं सगळ्यांचच मत पडल्यामुळे आशिषला तशी वेगळी परवानगी काढावी लागली.नशीबानी रश्मीला आठ दिवसांसाठी ती मिळाली देखील!
दुबईत सोयी खूपच चांगल्या होत्या.रश्मीनी स्वैपाकघरात सामान भरून तिथल्या स्वैपाकाच्या माणसाला घरगुती स्वैपाकाच्या टीप दिल्या.
चौथ्या दिवशी आनंद अचानक दुबईला आला.आणि सरळ आशिष रहात होता त्या अपार्टमेंट मध्येच त्यांच्या घरी आला.रश्मी एकटीच घरी होती."ह्या मंडळींची ओळख आणि कामं समजवून द्यायला आलो"आनंदनी येण्याचा खुलासा केला... आणि"इज एव्हरीथिंग ओ.के.हिअर? असं रश्मीला विचारायलाही विसरला नाही.रश्मीनी पण जे काही हवं होतं ते मोकळेपणानं सांगितलं.
दुबईहून परताना आनंद तिच्या बरोबरच विमानात होता.तिच्या शेजारची सीट घेऊन "सो,वी कॅन टाॅक अबाऊट अवर अॅड!विल डू ना? असं नम्रपणे विचारलं. तिच्या एजन्सी बद्दल, तिच्या कामाबद्दल त्यानं आवर्जून चौकशी केली.बोलता बोलता त्याच शिक्षण,कामाचा आवाका, कंपनीतली पोझिशन लक्षात आल्यावर रश्मीपण त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागली.
नंतरच वर्ष आनंदनी तिच्या एजन्सीला जाहिरातीसाठी संपर्क केल्यामुळे ती खूपच बिझी झाली कारण त्या जाहिरातीची पूर्ण जबाबदारी एजन्सीनं तिच्यावर टाकली होती.शूटींग, पेपरसाठी राईटअप,जिंगल् ,फेमस अॅक्टरच्या अपाॅटमेंटस् सर्व करताना दोन वर्षे कुठं गेली कळलंच नाही.आनंदशी पण खूप छान जवळीक निर्माण झाली होती.
जाहिरातीचं खूप जोरात लाॅंचिंग झालं.आणि अवघ्या काही दिवसांत जाहिरात आवडल्याच्या बातम्या देखील येऊ लागल्या.रश्मी खूप खूष होती.
आशिषचे यायचे दिवस जवळ यायला लागले होते.मुली,आजींना घेऊन रश्मीनी त्याला घ्यायला जायच ठरत होतं.तशी तिकीटं पण काढली गेली.पण अचानक आलेल्या कामामुळे तिची रजा कॅन्सल झाली.आणि मुलींना घेऊन सासुबाई एकट्याच दुबईला गेल्या.आणि अचानक रश्मीला स्वत: साठी वेळ मिळाला.
सगळी मंडळी यायला दोन दिवस असताना आनंदनी तिला फोन करून "ऍडचा सक्सेस सेलिब्रेट करूया? आज डिनरला तुझ्या घराजवळच्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये भेटशील? असं विचारलं.तिला पण कंटाळा आला होता त्यामुळे ती लगेच तयार झाली.
आनंदनी तिला वाईन ऑफर केली.अनेकदा आशिष बरोबर ती घेत असल्यामुळे तिनी पण घेतली! पण ह्यावेळी तिला लागल्याचं जाणवू लागलं. थोडंसं खाऊन निघते म्हणून ती उठली पण तिचा तोल गेलाच.आनंदनी तिला कमरेत हात घालून सावरलं.तिच्या नकळत ती त्याच्या मिठीत होती.
तिला सावरत आनंदनी हाॅटेलच्या रूमवर नेलं.कारण तिला अजिबात शुद्ध नव्हती.शरीराचं ते बहरणं, फुलणं घेऊन ती एका धुंदीत आनंदच्या मिठीत गेली होती.आणि त्याच्या सुगंधात विरघळून गेली होती.हवहवंस वाटणारं काहीतरी आनंद भरभरून देत होता.
जाग आली तेव्हा पहाटेचे चार वाजले होते.ती झटकन बेडवर बसली.मंद प्रकाशात आनंद समोरच्या खुर्चीवर झोपलेला होता."अरे बापरे,काय घडलं हे! धडपडत उठून ती दरवाज्याकडे निघाली.तिच्या चाहूल लागून आनंद उठला."साॅरी म्हणत तो जवळ येऊ लागला. त्याच्याकडे न बघता ती तडक खाली पोर्च मध्ये उभ्या असलेल्या तिच्या गाडीकडे गेली.घरी पोचल्यावर बाथरूम मध्ये शाॅवरखाली उभी राहिली."कसला मोह पडला आपल्याला? कित्येक वेळा आपण वाईन घेतोय.पण असं कधीच झालं नाही.उद्या आशिष येतोय, मी कशी त्याच्या समोर जाऊ? रश्मीला विचारानी काही सुचत नव्हतं.
फ्लाईट मध्यरात्री होती त्यामुळे शांतपणे विचार करायला हवा असलेला वेळ मिळणार होता.नशीबानी आज रविवार आहे."रश्मीला काही सुचतच नव्हतं.तिच्या मनात आलं अस जर आशिष वागला असता तर.....आपण सहनसुध्दा करु शकणार नाही!नाही कोणत्याही परिस्थितीत आपण हे आशिषला कळू द्यायचं नाही.मोहाच्या एका क्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य आपण पणाला नाही लावायचं.
ड्रायव्हरला गाडी पार्क करायला सांगून रश्मी एअरपोर्टच्या काॅरीडाॅरमध्ये वाट बघत होती.विमान लॅण्ड झालं होतं.बाहेर यायला अर्धा तास तरी लागणार होता.गेल्या वर्षभरात आशिषला बघितलं नव्हतं.
समोरून स्लीम, रेड टी शर्ट मधल्या आशिषला बघून ती धावली आणि आशिष पण तिचा हात धरुन म्हणाला"रशी, दुबईला मला तुझ्या नीटनेटकेपणाची इतकी गरज जाणवली की मी जिम जाॅईन केलं"आशिष बोलत होता पण रश्मीला वाटलं मला नको ती टापटीप मला तू हवा आहेस.आणि कळल्यासारख आशिषनी तिला जवळ ओढलं आणि त्याच्या मिठीत जाणवलेली सुरक्षितता ,नकळत ती हमसाहमशी रडू लागली.
रडतारडता तिचं लक्ष समोर उभ्या असलेल्या मुलींकडे गेलं त्या तिच्याकडे छोटंसं तोंड करून बघत होत्या.... तिनं स्वत:ला आशिषच्या मिठीतून सोडवलं आणि मुलींकडे धावली खाली बसून तिनं मुलींना जवळ घेतलं आणि तिला वाटलं'हे सगळं खरंखुरं माझं आहे. शाश्वत आहे.मला हे अजिबात गमवायचं नाहीय.तिच्या सासूबाई तिच्या डोक्यावर हात फिरवत होत्या.
"खूप दिवसांनी हिंदी गाणी, असं म्हणत आशिषनी रेडिओ सूरू केला.आणि 'ये मोह मोह के धागे। तेरी उंगलियोंसे जा उलझे। गाण्याचे स्वर तिला अंतर्मुख करत होते.पुन्हा भरलेल्या डोळ्यांनी तिनं गाडीत मान मागे टाकली.
ललिता छेडा

"सुगंध कोण आणि कसा लावतं ह्यावर असं दरवळणं अवलंबून असावं बहुतेक" हे वाक्य आवडलं.तिचं थांबणं ही आवडलं.
ReplyDeleteAgree!!
DeleteOut of way jaanari katha but shashwat satya kaay te hi sangnari katha.
ReplyDeleteExcelling madam👍
ReplyDeleteTrue to life,alluring moments do come. But resolution and firm values keep one steadfastly on terra firma.
मोहाच्या क्षणाची जाणीव झाली .यातच सगळे कथानकाचे सार आहे.
ReplyDeleteवास्तवाला थेट भिडणारी ' मोह ' ही कथा काहीशी वेगळी आहे. आयुष्यात मोहाचे क्षण येतातच. त्याची अनेक कारणे असतात. पतिच्या रुक्ष, अरसिक स्वभावामुळे रश्मिची होणारी घुसमट कथेत वर्णन केली आहे. तिचे कलासक्त मन अतृृप्त असते. आनंदच्या सहवासात आल्यानंतर समाजमान्य नसलेले ' घडू नये ते घडते '. आजवर कधीही न मिळालेल्या सुखात नाहून निघाल्याचे मान्य करण्याचा धीटपणा रश्मिकडे आहे. वाईनचे फक्त निमित्त.
ReplyDeleteपतिच्या बाबतीत हे घडले असते तर आपण काय केले असते असा प्रश्न ती स्वत:ला विचारते. उत्तर नकारार्थी असते.
शेवटी हे सगळे पतिला न सांगण्याचा निर्णय रश्मि घेते आणि त्याचे स्वागत करते. कोण बरोबर कोण चूक , कोणाचे काय चुकले वगैरे वाचक आपापल्या वैचारिकतेनुसार ठरवतील.
ललिता छेडा यांच्या या कथेमुळे वैवाहिक सहजीवनातले वास्तव समोर आले आहे .
सर्वांनी केलेल्या उत्कृष्ट समीक्षेसाठी मनापासून आभार
ReplyDeleteमोहाच्या क्षणी मोहरणारी आणि आणि वास्तवात भानावर येणारी ती सहवासाचा सुगधं तिला मोहात टाकतो खरा पण वेळीच भानावर येणारी रश्मी आवडली तुझं लिहण छानच लिहीत राहा.
ReplyDeleteKhup avadali katha!
ReplyDelete