बस दादरला पोचली तेव्हा दुपार झाली होती. बस मधून बाहेर पाऊल ठेवताना दीपाच्या मनात विचार आला'स्वप्ननगरीतल आपल हे पहिल पाऊल'तिच्या मागून उतरणा-या दिलीपनी तिच्या हातात बॅग दिली आणि म्हटलं" मी समोर जाऊन ज्या एजन्सीत काम करतो त्या मालकांना भेटून येतो.तू त्या समोरच्या कट्ट्यावर बैस.आलो पटकन!अस म्हणून दादांनी रस्ता क्राॅस केला.आपल्या भावाबरोबर दीपा पहिल्यांदाच मुंबईत आली होती.
आजूबाजूला इतक्या दुपारी पण वाहत्या रस्त्यावरची माणस,वाहन बघून दीपा भांबावून गेली होती.
इतक्यात एक माणूस जवळ येऊन म्हणाला'किधर जाना है'तिने मानेनीच नकार दिला आणि दोन्ही बॅगा जवळ ओढून घेतल्या."डरो मत तुमको कहां जाना है मै छोडता हू,ऐसा ही सब लोग बम्बई में खो जाते हैं।दीपाला प्रचंड एकटेपणा जाणवला आणि तिचे डोळे भरून आले.तो माणूस जवळ आला आणि मागून दादाचा आवाज आला "क्या है। त्याबरोबर तो माणूस इतका झटकन नाहीसा झाला की दीपाला वाटल खरच काही घडल कि मला भास झाला! "काय म्हणत होता तो? दादानी विचारल. "जाऊ दे आता लवकर घरी चल" दीपाची अस्वस्थता लपत नव्हती . शहरातल्या अनुभवांची सुरवात झाली होती."हे बघ दीपा इथ अस काहीही घडलं तरी घाबरून जाऊ नकोस."दादा समजावत होता पण दीपाला कधी एकदा घरी जाते अस झाल होत."चल आज आपण टॅक्सीनी जाऊ,नंतर मात्र तुला बसचे नंबर लक्षात ठेवावे लागतील.आपण आत्ता कुठे आहोत? दीपानी भीतभीतच विचारल.अग हे दादर टी.टी.आहे आणि आपली चाळ आहे लोअर परेलला! दादा टॅक्सीत बॅग टाकत म्हणाला.
एका मोठ्या पुलाच्या बाजूला टॅक्सी उभी राहिली.उजव्या हाताच्या तीन मजली चाळीकडे हात दाखवून दादा म्हणाला"ही आपली चाळ आणि त्या कोपऱ्यात जी गॅलरी दिसतेय ते आपलं घर!दीपाला ती गॅलरी खूप आवडली.
B.sc.नंतर हाॅस्पिटल मॅनेजमेंट करायला ती शहरात आली होती. नवी मुंबईत पार्ट टाईम क्लासमध्ये अॅडमिशनसुध्दा दादाच्या ओळखीनी मिळाली होती.पण शहरातल्या प्रचंड गर्दीच तिला दडपण आल होत.दादाच घर मात्र तिला बघताच क्षणी आवडल, दोन दिवाण,टी.व्ही.,मोजक फर्निचर असलेली बाहेरची खोली आणि आत स्वैपाकघर त्याला लागून ती गॅलरी!
शहरातल्या धावपळीच्या जगात दीपा हळूहळू रुळू लागली.पण शहरात फिरताना,रेल्वेनी प्रवास करताना, तिची अस्वस्थता वाढतच होती तिला सारख वाटत होत की लोंढेच्या लोंढे सामावून घेणार हे शहर खूप एकट होत चाललय!
धावणा-या ह्या सर्वांचा एकेमेकांशी संवाद संपत चाललाय! समोर दिसणारे टाॅवर आणि पुलाखाली असणा-या झोपड्या दोन्ही जगातल अंतर वाढतय! इथे शिकून मी माझ्या गावांसाठी काही करू शकते का?तर त्याच उत्तर नाही येतय तिथेही ओसाड पडणारी गाव एकट्या वृध्दांना सांभाळतायत.
त्यातच एल्फिन्स्टनच्या पुलाची दुर्घटना घडली आणि ज्यावेळी ते सर्व घडत होतं ती पुलावर होती.इतक भयानक घडत होतं आणि आपण काहीच करू शकत नसल्याची असहाय्यता! तिला बसलेल्या शाॅक मधून बाहेर यायला तिला महिना लागला!
. त्या दिवसात ती सतत गॅलरीत बसुन रहायची दादानी तिला समजावल पण तिला कुठे जाव अस वाटत नव्हत.
. एका संध्याकाळी ती खाली उतरली आणि चाळीसमोरचा चहाच्या टपरीवरचा छोटू तिच्या जवळ आला. रोज येताजाता त्याच्याशी ओळख झाली होती."ताई हल्ली बाहेर नाही पडत ना!"छोटू विचारत होता पण दीपाला कळेना काय बोलाव.ती नुसती हसली. ताई पुलावर झालेल विसरता येत नाहीय ना?एकट वाटतय ना!पण खरं सांगू ताई जे घडून गेलय त्यावर विचार करण्यापेक्षा ते पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.ताई मी दिवसभर काम करून शिकतोय! मला रस्त्यावरच्या मुलांसाठी काम करायचय! ह्या शहराचे प्रश्न खूप आहेत म्हणून हातपाय गाळून चालणार नाही ताई! तुम्ही तर हाॅस्पिटल मॅनेजमेंट करताय ना?दीपा त्याच्याकडे बघतच राहिली."घाबरू नका ताई आपल्या एरियातल्या माणसांकडे आमच लक्ष असतं"छोटू हसतहसत म्हणाला.दीपाला पण न कळत हसू फुटलं!आता उद्या पासून क्लासला जायला लागा.तुमची मदत तर आम्हा सर्वांना नेहमीच लागणार आहे.तुमच्या गावच्या हाॅस्पिटलसाठी पण आपण काम करूया!
दीपाला समोरच्या अजस्त्र पूलावर इंद्रधनुष्य दिसूं लागल जे ह्या शहराला गावाशी जोडत होत!त्या इंद्रधनूच्या पुलावरून ती छोटू सारख्यांचा हात धरून चालणार होती.

No comments:
Post a Comment