सुधाचा दिवस खरं म्हणजे पहाटे पाच वाजताच सूरू व्हायचा पण आज मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आणि ह्यावर्षी भजनी मंडळाच्या बायकांनी सगळ्यांनी त्यांचा घरातल्या देवीच्या मूर्तीची एकत्र पुजा करण्याचं ठरवलं होतं.त्यामुळे त्या अंमळ लवकरच उठल्या.हाॅल मधल त्यांच देवीच मंदिर स्वच्छ कराव लागेल,हाॅलपण आवरावा लागेल ह्या विचारांनीच त्यांना जाग आली होती.
देवीच्या मूर्ती समोर उभ्या राहिल्यावर सुधाला आठवलं ती गांवच्या घरातून मुंबईला जायला निघाली तेव्हा सासुबाईंनी किती प्रेमानी विचारलं होतं की"तुला काय हवंय ह्या घराची आठवण म्हणून?"तिनी क्षणाचाही विचार न करता म्हटलं होतं"कमळात बसलेली देवघरातली संगमरवरी देवीची मूर्ती! आणि सासूबाईंनी पण आनंदाने मूर्ती न्यायला परवानगी दिली.
कारण ती सदाशिवशी लग्न करून कोल्हापूरजवळच्या त्या छोट्याश्या गावात आली तेव्हापासून तिची देवघरातल्या त्या मुर्तिशी
जवळीक निर्माण झाली होती.तिला ती मूर्ती अतिशय आवडली होती. आणि सासूबाईंपण तिची त्या मुर्तिवरची श्रद्धा जाणून होत्या.
आणि तिची ह्या घरातली दुसरी आवडती गोष्ट म्हणजे दागिने बनवण्याच्या घरच्या व्यवसायातले दागिने!
सुधाचे दोन्ही मोठे दिर दागिने बनविणारे कारागीर होते.आणि घरातल्या दोन खोल्यात त्यांचे ते काम सुरू असे.बनलेला प्रत्येक दागिना मनातल्या मनात घालून बघायचा सुधाला नादच होता.
सगळे दागिने घालून फोटो काढायचं तिचं एक स्वप्न होत.
मोठमोठ्या सराफांची त्यांच्या घरी उठबस असे.
तिच्या नवर्याला सदाशिवला मात्र ह्या गोष्टीची आवड नव्हती.त्यामुळे तो शिकला आणि मुंबईत चांगल्या नोकरीला लागला.
भांडूपमधल्या सोसायटीत घर घेतल्यावर सदाशिवनी जवळजवळ दोन वर्षानी सुधाला मुंबईला बोलावलं.सुरवातीला सुधानी ती मुर्ति स्वैपाकघरात ठेवली.काही वर्षांनी घराला रंग द्यायच्या निमित्ताने सुधानी छानसं मखर करून मूर्ती बाहेर आणून ठेवली.आणि घर गेटजवळ पहिलंच असल्याने येणार्याजाणार्यांच्या नजरेस पडू लागली.नकळत मंडळी हात जोडू लागली.
त्या एरियातल्या भजनी मंडळाच्या बायकांनी देवीसमोर भजनाची प्रॅक्टिस सूरू केली.
एक दिवस हसत हसत सदाशिवनी सुधाला म्हटलंसुद्धा"घराचं मंदिर नको व्हायला येवढं लक्षात असू दे.
त्यावर सुधा हळव्या स्वरात म्हणाली"आपल्याला नाही मुलंबाळं, मला एकटीला कंटाळा येतो तुम्ही पण नसता दिवसभर, ह्या बायकांच्या येण्यानी,भजनांनी माझा वेळ छान जातो.
सुधा हातानं कामं करत होती,पण विचारात गढली होती.
अचानक सोसायटीतल्या इराची हांक आली"सुधामामी,उठलीस का? आणि तिच्या आवाजानी सुधा विचारांतून बाहेर आली.
अग, ये ना आणि उठलीस का काय विचारतेस? घर आवरतेय आज पूजा आहे ना घरी!सुधानी दार उघडलं आणि इराला घरांत घेतलं.
"त्या पूजेचच मला शूटिंग करायचंय! आमच्या चॅनलला मार्गशीर्ष महिन्याचा इव्हेंट दाखवायचाय"इरा कॅमेर्यासकटच आली होती.
इरांनी सुधाची छोटीशी मुलाखतच घेतली.मार्गशीर्ष महिन्याच महत्व,मुर्तिचा इतिहास सुधा खूप छान बोलली."अग मामी, तू कॅमर्यात काय मस्त दिसतेयस!बोललीस पण किती छान!
दुसऱ्या दिवशी टी.व्ही.वर साग्रसंगीत पूजा बघताना सगळ्यांनाच खूप गंमत वाटली.
तिसऱ्या-चौथ्या दिवशी सुधाला एका मोठ्या दागिन्यांच्या कंपनीच्या जाहिरातीसाठी तुम्ही काम कराल का?अस विचारणारा फोन आला.सुधाला काहीच कळेचना तिनं इराला बोलावलं.इरानी त्या कंपनीला परत फोन केला.आणि तिला कळलं की त्या कंपनीला तीन पिढ्या त्यांच्याकडे दागिने घेतात अशी जाहिरात करायची आहे.आणि मधली पिढी म्हणून सुधामामींना निवडलाय.त्यांना टी.व्ही.वर बघून त्यांनी तो फोन केला होता."अग पण फोटो काढायला येवढे दागिने कुठे आहेत माझ्याकडे?सुधाचा भाबडा प्रश्न ऐकून इरा हसली आणि म्हणाली"मामी, दागिने ते देणार!तुम्ही फक्त ते घालायचे सांगतील तस बसायचं आणि फोटो काढून घ्यायचा.! तुम्हाला त्याचे पैसे पण मिळतील."
सुधा अवाक् होऊन ऐकत राह्यली.तिच स्वप्न देवीनं पूर्ण केलं होतं.मार्गशीर्षातल्या गुरवारची पूजा तिला फळली होती.
बघता बघता सोसायटीत ही बातमी पसरली आणि सगळेजण मामींच्या घरी जमा झाले.सुधाला तर काय करावं काही सुचत नव्हतं.तिच्या स्वप्नाबद्दल ऐकल्याबरोबर कोणीतरी असंच माझं स्वप्न पूर्ण होऊदे 'माझ्या मुलाला नोकरी लागू दे' असं म्हणून देवीला हळदकुंकू वाह्यलं आणि बघता बघता एक छोटीशी लाईनच देवीपूढे लागली.
हे सगळं बघून सदाशिवला मात्र"हे सगळं श्रद्धेकडून अंधश्रद्धेकडे जाताय की काय अशी शंका आली.आणि ह्यासाठी काही तरी करायला हव असं पण जाणवलं.
जाहिरातीच्या शूटिंगसाठी सुधाबरोबर इरा आणि सदाशिव दोघेही आले होते.सुधाला सुंदर साडी आणि गळ्यात, हातात घालायला दागिने दिले आणि ती अक्षरशः मोहरून गेली.
कंपनीने जमलं तर टी.व्ही.मधली मूर्ती पण आणा असं म्हटल्यामुळे मूर्ती पण बरोबर होतीच.मूर्तीजवळच एका झोपाळ्यावर तीनही पिढ्यांच्या स्त्रीयांना बसवून शुटिंग सुरू होत.सुधाला आपल्या अंगावर इतके दागिने आहेत ह्यावर विश्वासच बसत नव्हता.ती सारखी आरशात जाऊन बघत होती.आयुष्यभराचं स्वप्न असं पूर्ण होईल ह्याचा आनंद काही औरच होता.
मूर्तिला थोड्या वेळात खूप सुंदर स्वच्छ करून आणि छान रंगवल होतं.मुर्तिला तिच्या मापाचे दागिने घातले होते.मूर्ति खूप तेजस्वी दिसत होती.
सगळ्यांनी दिवसभराच शुटिंग एन्जाॅय केलं होतं.
घरी परताना बघितलं तर मूर्ती एका फुलांनी सजवलेल्या मखरात प्रवेशद्वारावर ठेवली होती. अगोदरच तिथे एक गणपतीची मूर्ती होती तिच्या शेजारी देवीची मूर्ती छान वाटत होती. राहू दे थोडे दिवस इथेच अशी त्या मंडळीनी विनंती केली.
आणि सदाशिवला हळूच कंपनीच्या मालकांनी "तुम्ही परवानगी दिलीत तर आयुष्यभर इथेच छान मखरात ठेवू" असं म्हटलं.सदाशिवनी हसून सुधाकडे हात दाखवला.सुधा मूर्ती समोर डोळे मिटून उभी राह्यली होती.
सोसायटीत सगळेजण वाटच बघत होते.नवस बोलणार्या काकूंच्या लेकाला इंटरव्ह्यूचा काॅल आला होता.त्यामुळे सर्वजण दारातच मूर्तीची चौकशी करू लागले.
कोणीतरी म्हणालं सुध्दा"आता आपण गेटवर त्या देवीच मंदिरच बनवूया"
सदाशिवला मंदीर बनवण्यापेक्षा मूर्तीला छान स्थान मिळालय असं वाटत होतं.पण म्हणजे देवीला आपल्या घरातून आपण बाहेर काढतोय का? त्याला काहीच कळत नव्हतं.का इतकी वर्ष आहे तशी आपल्या घरातच ठेवावी.सदाशिवला वाटलं आपण फार विचार करतोय.ठरवू दे सुधाला काय करायचं ते! कारण ती मूर्ती तिनीच आणली होती.
त्याच्या मनातलं ओळखल्या सारख सुधा म्हणाली"हे बघा सध्या तरी आम्ही मूर्ती तिथेच ठेऊन आलोय त्या मंडळींनी मूर्ती शोभून दिसेल अशा जागेवर ठेवलीय.आम्हाला ते आवडलय.
सदाशिवला बरं वाटलं की सुधाची परमेश्वरावरची श्रध्दा खरी आहे.त्यासाठी तिला मूर्तीची गरज नाही.
-ललिता छेडा.

No comments:
Post a Comment