आॅगस्ट म्हणजे देशभक्तीचा महिना! ह्याच महिन्यातल्या ९ आॅगस्टला क्रांती दिन साजरा केला जातो. कारण ८ आॅगस्टला गांधीजींनी ब्रिटीशांना 'भारत छोडो'चा इशारा दिला आणि ९ तारखेला सर्वत्र जनक्षोभ उसळला. तो स्वातंत्र्याचा शेवटचा आणि मोठा लढा! ह्याच वेळी अरूणा असफली यांनी इंग्रजांना न जुमानता गोवालिया टॅंकवर तिरंगा फडकवला होता. हे सगळं लिहीण्याचं कारण म्हणजे नुकतेच टी. व्ही. वर स्वातंत्र्यदिनादिवशी तरुण पिढीला काही प्रश्र्न विचारले जात होते आणि दुर्दैवानं बरीचशी उत्तरं त्यांना देता येत नव्हती!! त्यातला एक प्रश्न होता "स्वातंत्र लढ्यात सहभागी असलेल्या एका महिलेच नांव सांगा? १५/२० जणांमध्ये कोणालाही एक नांव सांगता आलं नाही. प्रश्र्न रस्त्यावर विचारत होते. त्यामुळे एक मुलगा म्हणाला"असं अचानक कसं आठवेल? त्यावर पत्रकारानी छान उत्तर दिलं "स्वात्रंत्र्याविषयी काहीही झोपेतसुध्दा विचारलं तर उत्तर यायला हवं! "तुम मुझे खून दो.. कोणी म्हटलं आहे? ९० टक्के मुलांना उत्तर सांगता आलं नाही.
तेव्हा मनात विचार आला की ह्या पिढीला मिळालेलं स्वातंत्र्य ही अशी संकल्पना आहे जी हक्क आणि जबाबदारीची जाणीव करून देते हे सांगण्याची आवश्यकता आहे असं जाणवतंय! त्यामुळे 'इंडिपेंडन्स' म्हणजे आपल्यावर कोणाचंही बंधन नाही असा साळसूद अर्थ काढला जातो.
ह्यावर्षीचा आपला ७४ वा स्वातंत्र दिन होता. पण तो कोरोनाच्या छायेतच साजरा करावा लागला.
कोरोनाच्या ह्या काळात बंधन आणि स्वातंत्र्य दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालायला हव्या होत्या. पण तसं होताना कमी जाणवलं. लोकांनी स्वत: पूढे होऊन सरकारी यंत्रणेला मदत करावी अशी अपेक्षा होती. पण हातावर पोट असलेल्या लोकांबरोबर उगीचच मास्क न लावता फिरणारे ही बरेच होते. हा स्वातंत्र्याचा दुरूपयोग आहे असं वाटलं!! त्याचबरोबर नियोजनाच्या अभावामुळे लाॅकडाऊनमध्ये व्यवस्थापनही नीट होऊ शकत नव्हतं.स्वातंत्र्या विषयी अच्युत गोडबोले ह्यांनी खूप छान लिहिलंय "स्वातंत्र्य ह्या संकल्पनेला ठराविक चौकटीत बसवण्यापेक्षा ह्या संकल्पनेच्या अर्थाचा आता शोध घ्यायला हवाय. म्हणजेच भारतातल्या प्रत्येकाला अगदी तळागाळातील लोकांपर्यंत किमान सोईसुविधा निवारा, वीज, शिक्षण, वाहतूकीसाठी सोय आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्य हे सर्व मिळालंच पाहिजे"
तसंच मिळालेलं स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं प्रत्येकानं कसं जोपासावं हा सुध्दा एक महत्त्वाचा सामाजिक विचार होऊ शकतो. स्वत:वर अनेक सामाजिक बाबींबाबत स्वत:चं नियंत्रण असलंच पाहिजे. अगदी साधी रस्त्यावर थुकण्याची सवय!! हा स्वच्छतेचा साधा नियम पाळण्याची किती गरज आहे आणि आता आरोग्याचा प्रश्न इतका गंभीर झाला आहे अशावेळी तरी असे साधे साधे स्वच्छतेचे नियम पाळणं आवश्यक आहे नाही का?
चंगळवाद, पर्यावरणाचा समतोल, निसर्गाची जपणूक ह्या सगळ्या गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार करणं म्हणजे स्वातंत्र्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणं आहे. इथं सर्च संस्थेच्या डॉ. आनंद बंग ह्याना लोकसंख्येवर प्रश्र्न विचारल्यावर "माणसं 'किती' पेक्षा 'कशी' आहेत हे महत्वाचं आहे." असं उत्तर दिलं होतं. तेव्हा माणसं कशी आहेत ह्यावर समाजाच्या स्वातंत्र्याचं भविष्य ठरणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.
स्वातंत्र्य अंमलबजावणीत मोठी अडचण स्त्रीयांच्या बाबतीत येते. स्वातंत्र्य मिळालं आहे पण त्याचा वापर कसा करायचा ते मात्र दुसरं कोणी तरी ठरवणार. अशा परिस्थितीशी लढा द्यायला बळ देणार्या अनेक संस्थां/स्रिया अशा महिलांच्या पाठीशी उभ्या आहेत. पण जेव्हा एखादी स्त्री नोकरीच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाविरूध्द आवाज उठवेलं किंवा घरातल्या जवळच्या नातेवाईकाकडून लैंगिक छळाविषयी प्रतिकार करेल तेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ कळतोय असं म्हणू शकतो.
१५ आॅगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्याविषयी संकल्पना, संवेदना ह्यावर वाचलेल्या लेखांमधून, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून मला जे वाटलं ते लिहीण्याचा प्रयत्न केला.
हीच भावना मनात कायम असते आणि तशीच असली पाहिजे.
भाद्रपद शुद्ध पौर्णिमा
ता. १.८.२०२०
ललिता छेडा
सध्याच्या परिस्थितीशी निगडित विचार. देशाविषयी भावना व्यक्त. छान
ReplyDeleteCasinos Near The Casino, Atlantic City, NJ - MapYRO
ReplyDeleteCasinos Near The Casino, Atlantic 천안 출장안마 City, NJ. 울산광역 출장안마 0.3 mi. High 5 Casino 대전광역 출장안마 Atlantic City - MapYRO users can 부산광역 출장샵 browse through detailed directory 부산광역 출장안마 directory access