मनातलंं लिहायला सुरवात करताना ती कथाच असावी असंं वाटलंं म्हणून.....
या सगळ्यात तिला तिच्या एकटेपणाचा अचानक आधार वाटू लागला. कारण तांबूस जांभळी पश्चिमा तिला आत कुठेतरी सुखावत होती. समुद्राचं संगीत तिला प्रसन्न करत होतंं. तिला वाटलं ती कुठे एकटी आहे. दिवसभर रंगांची उधळण करणारा सूर्य, लाटांचे नर्तन करणारा समुद्र आहे की तिच्यासोबत !! आणि त्यांच्यासारखं सगळ्यात असूनही अलिप्त राहून एकटंं असण्याचा आनंदही घेता येईल तिला एकटेपणाशी मैत्री करून!!
मैत्री एकटेपणाशी
तिन्ही सांजेला तिला बाहेर पडताना बघून आईने ''कुठे'' असे नजरेने विचारले. 'फिरायला'. तिनेही तुटक उत्तर दिलंं. एकटीच कुठे निघालीस?आईच्या पुटपुटण्याकडे तिने लक्ष दिलंं नाही. घटस्फोटानंतर पहिल्यांदाच ती घराबाहेर पडत होती.समाजातल्या अनेक प्रश्नातल्या एका प्रश्नाला आपलंं भिडण आणि घटस्फोट हे उत्तर मिळवणंं खूप कठीण होत. पण सहन करण आणि जगण ह्यात तिनी 'जगण' निवडलंं होत.
समुद्रावर छोटेबच्चे कंपनी वाळूचे किल्ले करत होती.तर तरुण युगुले स्वप्नांची घर बांधत होती. जेष्ठांची नजर क्षितीजापलीकडे काहीतरी शोधत होती.


छान सुरवात ....
ReplyDelete