'इंदिरा संत' माझ्या आवडत्या लेखिका, कवियत्री.....त्यांचा स्मृतिदिन जुलै महिन्यात येतो तेव्हा त्यांच्याच माझ्या आवडत्या पुस्तकाबद्दल लिहायचं ठरवलं. त्यांचा 'मृद् गंध' हा ललित लेखांचा संग्रह म्हणजे माझं अतिशय जवळच पुस्तक.
त्यांचे विचार, त्यांच्या आठवणी आणि त्यांचे अनुभव सहजसुंदर प्रवाही भाषेत असणं हे ह्या लेखांच वैशिष्ट्य आहे. आत्मकथनात्मक आठवणींमुळे अनेकदा ते प्रत्येकाला आपले स्वत:चेच अनुभव वाटतात.
खिडकी झोपाळ्यावरी बसू, चुलघरात, भाववाहिनीच्या काठावर हे लेख आपल्या प्रत्येकाला स्वत:च्या घरातल्या खास जागेशी असलेलं नातं आठवून एक प्रसन्न अनुभव देतात. प्रत्येक स्त्रीला चुलघर वाचताना इंदिराबाई म्हणतात तसं 'ज्या घरातील स्वैंपाकघर आनंदमय, प्रसन्न असते, ते घर मला धन्य धन्य वाटते'. अशी भावना निर्माण करते.
प्रभाकर पाध्यांनी ह्या लेखांबद्दल खूप छान लिहिलंय" कोकणात गुळपाण्याने स्वागत करतात त्यातला आपलेपणा, गोडवा आणि सांस्कृतिक सहजता सर्वांनाच फार भावते....तसंच काहीसं तुमच्या सगळ्या लेखांतून जाणवतं" लेख वाचताना आपल्याला पण एक गोष्ट जाणवते की स्वत:शी बोलत असताना त्या आपल्याशी पण बोलत असल्याचा आपलेपणा वाचकांना वाटतो. उदाहरण द्यायचं तर 'माझं ऐक' ह्या लेखात अनाहूतपणे 'माझं ऐक' सांगणार्या लोकांना आपल्या सल्ल्यामुळे होणार्या परिणामांची कल्पना पण नसते हे स्वानुभवातून इंदिराबाईंनी इतकं सहजसोप्या भाषेत सांगितलंय की ते आपल्याला मनोमनी पटून जातं.
तवंदीच्या आठवणी तर प्रत्येक माहेरवाशिणीला आपल्या गावाला, माहेराला घेऊन जातात. त्यांच्या झोपाळ्यावरच्या गप्पात जवळची फुलं, दूरचा यळ्ळूरगड, शेजारचा माळ सगळं सामील असतंच. त्याशिवाय त्यांच्या लेखातली पाणंदीची वाट, धुळफुलांची वास लेवून जाणारी पाऊलवाट, अष्टमीचं चांदणं सगळ सगळ मनावर पसरून जात..कर्हाड, बेळगाव ह्या गावांचे अनुभव पण असेच निसर्गरम्य आठवणींचे, वेगवेगळ्या अनुभवांचे आहेत.
संसार संगीतातल्या सुरांबद्दल 'सुर.... संवादी विसंवादी' ह्या लेखात लिहीताना त्या संसाराची सुरेल भैरवी व्हायला हवी असं म्हणतात. मैत्रिणीच्या मुलीची लग्नाबद्दलची मतं ऐकून आता मुली किती गंभीरपणे आणि स्वतंत्रपणे विचार करू लागल्या आहेत, आपली मतं घरच्यां समोर मांडू लागल्या आहेत आणि हे इंदिराबाईंना मनापासून आवडतंय असं त्या आवर्जून लिहीतात.
माझे संमेलनाध्यक्षपद, एक न दिलेली मुलाखत असे लेख खरं म्हणजे त्यांना आलेले अनुभव आहेत पण त्यांनी ते सुद्धा त्यातली कटुता जास्त न दाखवता पारदर्शकपणे लिहीले आहेत.
माझी मैत्रीण सरोज हिने वाचलेला इंदिराबाईंच्या आयुष्यातील एक हृदय प्रसंग मला सांगितला 'संत पतिपत्नींनी विवाहाच्या आणाभाका घेताना एकेमेकांच्या बोटात बुचाच्या फुलांच्या मुद्रिका घातल्या होत्या. निसर्ग साक्षीचा किती सुंदर प्रसंग!
स्वच्छ सोनेरी उन्हाने
कधी झळालेलं मन
केव्हा कधी संपणार
माझ्या मनातील रात
असं लिहीणार्या इंदिराबाईंनी पति प्रा. ना. मा. संत यांच्या निधनानंतर चिरवियोगाचं दु:ख मनात ठेवून आपल्या तीन मुलांचं संगोपन केलं. त्याचकाळात लहान मुलांसाठी गोष्टी लिहून त्यांनी त्यांचा साहित्यिक प्रवासही सुरू केला. त्यानंतर मात्र त्यांनी लिहीलेल्या कवितांची निसर्ग, प्रेम, एकटेपणा आणि स्त्रीत्व हीच चार सुत्र होती.
असा हा माझा आवडता 'मृद् गंध'!!
आत्मचरित्र किंवा आत्मकथन हा प्रकार वाचायला मला नेहमीच आवडतो. लेखकाच्या अनुभवातून कुठेतरी आपण माणसं वाचायला शिकतो. त्यातसुध्दा स्री-आत्मचरित्र मनात अनेक प्रश्नांचे काहूर निर्माण करतात. ह्या आत्मचरित्राच्या लेखिकांचा स्वत: कडे पहाण्याचा आणि समाजाचा तिच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन एक वाचक म्हणून आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवून जातो.
आत्मकथनातील माहेरच्या गावाची ओढ, नात्यांची जपणूक, मैत्रीचे नाते हे सगळं इतकं सुंदर गुंफलेले असतं की आज राखी पौर्णिमा असल्याने मृद् गंधातल्या भावकवितेनं शेवट करते.
"नेणता बंधू माझा,
सांभाळ पाठभूज
मी ग ओवी गाते,
जन्म देणाऱ्या देवा एका
नेणता बंधू माझा
फुलपाकळीमधी राखा"
अशी ही एका अनाम मालणीची एक भावगाथा.
श्रावण शुद्ध पौर्णिमा
ता.३ आॅगस्ट २०२०
ललिता छेडा

इंदिरा संत यांच्या वर इतक्या सहजपणे विचार मांडले यातच त्यांच्या बद्दल ची आत्मीयता दिसून येते. लेख मनाला भावला मँडम
ReplyDelete😊😊nicely written, but couldn't understand some words.
ReplyDeleteCA Jayshree Karve