पंचमीला ग बांधून झुला
श्रावण आला ग सखी श्रावण आला।
प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात उत्सवांचा ऋतू फुलवणारा श्रावण कायम हर्षच आणत असतो...
आषाढाचे २० दिवस नंतर श्रावण, भाद्रपद, अश्र्विन आणि पुन्हा कार्तिकाच्या सुरवातीचे १० दिवस असा एकूण चार महिन्यांचा चातुर्मास! त्या चार महिन्यातला श्रावण म्हणजे सृष्टीच्या चैतन्याचा महिना! ह्या महिन्यात प्रत्येकांसाठी आनंद देणारे सण-सोहळे साजरे केले जातात.
नवविवाहितेसाठी मंगळागौर, जिवतीची पुजा करुन मुलांना ओवाळणार्या आईसाठी मायेची ऊब, भावा-बहिणीचं नातं जपणारं रक्षाबंधन, घराघरात होणारी सत्यनारायणाची पूजा, त्याशिवाय गल्लीपासून मोठ्या मोठ्या चौकापर्यंत तरूणांसाठी गोकुळाष्टमीचा सार्वजनिक आनंदोत्सव, नारळी पौर्णिमेला निसर्गाची म्हणजेच समुद्राची पूजा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या महिन्यात आपल्या परंपरेनुसार प्राणीमात्रांसाठी सुध्दा कृतज्ञता व् श्रावणसरी! निसर्ग फक्त हिरव्यागार गालिच्यांनी सजलेला नसतो तर विविध रंगांची उधळणही करत असतो. एखादी सर येऊन गेल्यावर पडणारं पिवळं-केशरी ऊन, संध्याकाळी पाऊस पडून गेल्यावर ढगांची जांभळ्या, तांबड्या रंगांची रंगपंचमी, सुखावून टाकणारी वार्याची झुळूक! अशा पावसाळी वातावरणात डोंगरदऱ्यात फिरण्यासारखं सुख नाही पण ह्यावर्षी मात्र कोरोना संकटामुळे पावसाळी पर्यटन बंदच आहेत. पण निसर्गानी मात्र त्यामुळे मोकळा श्वास घेतलेला दिसतो.
माझी आई दर चातुर्मासात वेगवेगळे नेम धरत असे.
माझ्या आठवणीतले म्हणजे पांढरी फुलं, बेल, तुळस, दुर्वांच्या जुडी वाहायच्या, वाती लावायच्या असे चार महिने तिचे वेगवेगळे नेम चालायचे. तिच्या मैत्रिणी तिला त्यासाठी खूप मदत करायच्या. दामोदर हॉलच्या मागे छोटीशी बाग होती तिथं तिला खूप फुलं, दुर्वा मिळायच्या.
श्रावणातल्या दर शुक्रवारी जिवतीची पूजा मग मला ओवाळणं! एखाद्या शुक्रवारी सवाष्ण जेवायला असायची त्यादिवशी कधी पुरणपोळी कधी पुरणाच्या दिंडांचा बेत असं सगळं साग्रसंगीत असायचं. श्रावण सोमवारी शाळा लवकर सुटायची आणि त्यादिवशी जेवणं पण लवकर व्हायची. भाजलेल्या धान्याची खिचडी, धिरडी असा मेन्यू असायचा. श्रावणात आई प्रत्त्येक रानभाजी करायची. केन्या, टाकळा आणायला आम्ही दोघी कधी कधी डोंबिवलीला आत्यांकडे एखादी चक्कर सुध्दा मारत असू. मला आवडतात म्हणून ओल्या नारळाच्या करंज्या आणि नारळी भात हमखास ह्या महिन्यात व्हायचाच.
आमच्या परळच्या घरात माझ्या आईनं उषाकाकुची खूप हौसेनं मंगळागौर साजरी केली होती. रात्रभर खेळलेले मंगळागौरीचे खेळ, पहाटेची काॅफी सगळं अगदी लख्ख आठवणींत राहिलं आहे.
लग्नानंतर डोंबिवलीला आल्यावर श्रावणाचे खूप संदर्भ बदलले. गुजराती मंडळींची गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी शिळासप्तमी असते. मी ती आवर्जून करायला लागले. सप्तमीच्या आदल्या दिवशी भेळेची तयारी, वर्याचे तांदूळ आदल्या दिवशी शिजवून फ्रीजला ठेवायचे, दहीवडे, घारगे असे बरेच पदार्थ ह्यानिमित्तानं बनवून ठेवायचे आणि त्यामुळे सप्तमीचा दिवस मस्त आरामात जायचा. हा उपास आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी करावा हे कळल्यावर तर त्याला एक भावनिक जोड ही मिळाली.
ज्ञानदीप आणि महिला बॅंकेत काम करायला लागल्यावर हळदीकुंकू, सवाष्णीची ओटी भरणं ह्यासगळ्याला सामाजिक अर्थ असलेला जाणवला आणि विचार बदलले.
जैनांचं पर्युषण पर्व ह्याच महिन्यात सुरू होतं आणि भाद्रपदात संपत. त्यामुळे ती माहिती अर्थात भाद्रपदात येईल.
असा हा आठवणीतला श्रावण झुला......
महानोरांच्या शब्दात म्हणजे
।।रानांत रानांत जांभूळवनात
झडली श्रावणगाणी
गंधल्या मातीत पुनव उजट
अंकुरे लाख वितांनी।।
श्रावण
शुद्ध प्रतिपदा
ता. २१ जुलै २०२०
ललिता छेडा.

मस्त श्रावणातील आठवणी आपल्या पिढीने हे अनुभवले आहे. तुम्ही परत त्या वातावरणात नेले छान
ReplyDeleteमनभावन श्रावण
ReplyDeleteमनभावन श्रावण
ReplyDeleteखूप सूंदर श्रावण महिना, हिरवागार आनंद चैतन्य देणारा.
ReplyDeleteखूप सूंदर श्रावण महिना, हिरवागार आनंद चैतन्य देणारा
ReplyDelete--जयश्री कर्वे
सर्वांचे आभार
ReplyDelete