१५ मे जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा करत असताना टी.व्ही. वर आपल्या गावी, आपल्या कुटुंबात जाण्यासाठी धडपडणाऱ्या मजुरांना बघताना 'कुटुंब' शब्दाचा अर्थ कळत होता.
कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे घराबाहेर न पडणारी मी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडले होते. सकाळी अकरा वाजता ऊन अक्षरशः भाजून काढत होतं. अशा वेळी डोंबिवली म्युनिसिपाल्टीसमोर कमीत कमी हजार माणसांची लाईन होती. उत्सुकतेनं त्यांना विचारल्यावर ही मंडळी गावाला घरी परतण्यासाठी लागणाऱ्या सर्टिफिकेट, सह्या ह्यासाठी लाईनीत उभी होती. त्यातला एका ओळखीच्यालाच मी विचारलं "कहां जा रहे हो? "राजस्थान" त्यानं उत्तर दिलं. "यहां एक हाॅटेलमें काम करता था, गांव में घर पे बुड्ढे मां-बाप, बीबी-बच्चे है। इधर दसजन साथ में रहते थे। अब इस महामारी में साथ में रहभी नहीं सकता। अब जो होगा फॅमिली के साथ रहकर ही होने दो" तो बोलत होता आणि त्याच्या मनातलं दुःख डोळ्यात भरून आलं होतं. तो उभा असलेल्या लाईनीतला त्याचा नंबर दुपारी दोन वाजेपर्यंत लागेल की नाही कळतं नव्हतं. एक छोटीशी बॅग घेऊन तो निघाला होता. त्याला कळलं होतं' कुटुंबाबरोबर जगण्यासाठी सामान नाही तर फक्त इच्छा लागते'.
आपल्या भारतीय परंपरेत कुटुंबवत्सलतेचा संस्कार खूप महत्त्वाचा मानला जातो. विभक्त कुटुंब पद्धती आता वाढत असली तरी कुटुंबाशी जुळलेलं रहायला हवं हे आता सर्वानाच कळलेलं आहे.
आता त्यातही भर पडली आहे 'एक्स्टेंडेड फॅमिली' अर्थात 'विस्तारित कुटुंबांची'! रक्ताच्या नात्यांच्या इतकंच महत्व असलेल्या ह्या जिवलग मित्र मैत्रिणींच जवळचं कुटुंब बनलेलं असतं. रक्ताची नसली तरी मनानं, मायेनं जोडलेली ही नाती अनेकदा जगण्याला बळ देतात.
'वसुधैव कुटुंबकम्' हे शब्द खर्या अर्थानं अनेक व्यक्ती-संस्था सार्थ करत असतात. माझी मैत्रीण भारती मोरे एकल महिलांसाठी तिच्या ज्ञानदीप स्री जागृती मंचातर्फे गेली अनेक वर्षं काम करतेय. एकट्या राहणाऱ्या महिलांना आर्थिक, मानसिक आधार देण्याचं काम ही संस्था करतेय. ह्या संस्थेमुळे ओळख झालेल्या अनेकजणींचे इतके जवळचे संबंध झाले आहेत की एखाद्या कुटुंबाप्रमाणे त्या एकेमेकीच्या आनंदात सहभागी होतात, अडीअडचणीला मदतीला धावून जातात. विस्तारित कुटुंबाच एक सुंदर उदाहरण ह्या 'एकल पण एकत्र' रहाणार्या महिलांनी सर्वांसमोर ठेवलं आहे.
माझी दुसऱी मैत्रीण ज्योती पाटकर, जी आता आमच्यात नाही पण तिनं उभा केलेला टिटवाळ्यातला 'मुक्ता बालिकाश्रम' सुध्दा एक 'एक्स्टेंडेड फॅमिली' म्हणजे काय ते छान समजावून देते. ५ ते १८ वर्षाच्या अनाथ, अन्याय झालेल्या बालिकांसाठी हा आश्रम आहे. त्या मुलींना सांभाळणार्या, शिकवणार्या सगळ्या ताईसुध्दा एखाद्या कुटुंबाप्रमाणे त्यांना शेअरिंग केअरिंग शिकवतात. जेणेकरून त्या आश्रमातून बाहेर पडल्यावर सुध्दा सर्वांशी मिळून मिसळून राहू शकतील.
सध्याचे समाजमाध्यमातले फॅमिली गृप! म्हणजे कुटुंब शब्दाचा परीघ मोठा करू लागलेत. प्रत्यक्ष भेट होत नसली तरीही जगभरातले नातेवाईक, शाळेतल्या मैत्रीणी फेसबुक, व्हाॅटस् ॲप वरून फॅमिली बनू लागलेत. सध्याच्या कोरोनाच्या दिवसांत ही माध्यमातली कुटुंब खूप उपयोगी पडताहेत.
आयुष्याच्या सेकंड इनिंग मध्ये आपल्या कुटुंबातून काही कारणांनी बाहेर पडलेले अनेकजण वृध्दाश्रमातले शांत, निवांत जगणं कधी ऐच्छिक कधी मनाविरुद्ध स्वीकारतात आणि तो वृध्दाश्रम त्यांच कुटुंब बनतं.
जागतिक कुटुंब दिनानिमित्ताने इतक्या प्रकारच्या कुटुंब कथा आठवल्या. पण खर्या अर्थानं विश्र्वातील समस्त जीवांच्या हिताचे 'पसायदान' मागणार्या ज्ञानेश्वरांनी सर्व विश्र्वालाच कुटुंब मानलंय! आणि तसं मानणं हेच खरं आणि योग्य आहे.

जेष्ठ शुध्द पौर्णिमा
ता. ५ जुन २०२०
ललिता छेडा
ता. ५ जुन २०२०
ललिता छेडा
Extended the dimensions of the concept of family. Well perceived and penned.
ReplyDeleteCA Jayshree Karve
कौटुंबिक सुख जपले पाहिजे त्यातून मिळणारा आनंद खुप असतो
ReplyDelete