वैशाख साधारणपणे एप्रिल महिन्यात येतो आणि ह्या महिन्यातला महत्त्वाचा दिवस म्हणजे ७ एप्रिलचा जागतिक आरोग्य दिन!
आपण आणि आपल्या शरीराचा,मनाचा उत्तम संबंध म्हणजे निरामय 'आरोग्य' असं मला मनापासून वाटतं. कारण आजारपण येणं आणि त्यातुन बरं होऊन बाहेर पडणं ह्यासाठी आपलं शरीर आपल्याला माहीत असणं जितकं गरजेचं असतं तितकीचं मनात सकारात्मकता असणं पण आवश्यक असतं.मला झालेल्या वेगवेगळ्या 'आजारपणांच्या' अनुभवातून मी हे शिकलेय. आणि झालेल्या बहूतेक आजारांना यशस्वीरीत्या मी परतवून लावलंय.हे महत्त्वाचं!
फक्त स्वभावामुळे शरीरात साखरेचा गोडवा असण्याचं प्रमाण मात्र जरासं असतं.
लहानपणापासून माझी तब्येत तशी नाजूकच! आत्ता जे कस्तुरबा रुग्णालय कोरोनामुळे सर्वांना परिचित झालं आहे. तिथे मला साधारण तिसरी- चौथीत असताना घटसर्प झाल्यामुळे दाखल करावं लागलं होतं.जवळजवळ महिन्याभराच्या तिथल्या वास्तव्यात अनेक आठवणी मनात आहेत. माझ्या आईवडिलांनी घेतलेली काळजी,केलेली धावपळ अजुनही आठवतेय. तेव्हाही त्या रूग्णालयाची व्यवस्था, स्वच्छता, छान होती. आमचा लहान मुलांचा वाॅर्ड असल्यामुळे स्टाफ खूप चांगली काळजी घ्यायचा. शिफ्ट बदलली की थोडावेळ जायच्या आधी तिथल्या नर्स आमच्याशी गप्पा मारून, खेळून जायच्या! खूप वर्ष झाली तरी त्या आठवणी ताज्या आहेत.
मी डॉक्टरशी लग्न केल्यावर मैत्रीणी गमतीनं नेहमी म्हणतात" तू तुझ्या आजारपणाला डाॅक्टरशी लग्न करून मस्त इलाज शोधलास!!
माझ्या अनेक आजारांपैकी एक म्हणजे मला सोर्यासिससारखा स्कीनडिसीज झाला. आणि पायावर झालेल्या जखमा दिसायला आणि सहन करायला खूप कठिण झाल्या होत्या. पण त्यावेळी माझी नणंद हरकवंती धावत आली आणि जवळजवळ आठवडाभर दिवसांत तीन वेळा पाय स्वच्छ करून तिने त्या जखमा बऱ्या केल्या. माझ्या गुडघ्यांच्या ऑपरेशन नंतर इंदू,लता, राजश्री आणि जयश्री ह्यांनी दवाखान्यातल्या वेळा वाटून घेतल्या होत्या. अशी अनेक नावं सांगता येतील ज्यांच्या मदतीमुळे मी सर्व आजारपणांना अक्षरशः पळवून लावलं. त्यात घरच्यांची मदत तर असायचीच.
पण आता संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या ह्या कोरोनाच्या साथीनं मात्र सर्वांना हतबल करून टाकलं आहे.युरोपसारखा निसर्गरम्य देश, अमेरिकेसारखा बलाढ्य,प्रगत देश सर्वांनी ह्या आजारापुढे हात टेकलेत. जीवितहानीचे आंकडे तर ऐकवत नाहीत.
'लाॅकडाउन'हा शब्द पूर्वी कधी ऐकला सुध्दा नव्हता. तो शब्द आज जगण्याच्या एक महत्त्वाचा भाग बनून गेला आहे.पैसा, प्रतिष्ठा हे सगळं निरर्थक ठरलं आहे. प्रत्येकजण स्वत:च्या जगण्यासाठी धडपड करतोय. त्यामुळेच एकमेकांना भेटतानासुध्दा मोकळेपणाने न भेटता तोंडावर पट्टी लावून बोलावं लागतंय.
एका छोट्याशा व्हायरसनी आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलंय. मनात येत की पृथ्वी टाहो फोडून काहीतरी सांगत होती पण पुढे,पुढे जायच्या नादात आपल्याला तिचा आवाज ऐकूच आला नाही. आणि म्हणूनच तिनं बहूतेक संपूर्ण जग थांबवलं. तिनं दाखवून दिलं की खरा धर्म हा निसर्गाचे नियम पाळणं हाच आहे. कारण अवघ्या दोन महिन्यांत गंगा,यमुनेसारख्या सर्व नद्यांचं पाणी स्वच्छ झालं. आकाश निरभ्र दिसायला लागलं. हवेतलं प्रदुषण नियंत्रित झालं.
गरजा इतक्या कमी झाल्या की घरात बसून कुटुंबातला हरवलेला संवाद सापडला. खऱ्या-खोट्या नातेसंबंधांची ओळख झाली. स्वत:च्याच घराकडे नोकरी,व्यवसाय,अशा अनेक कारणांमुळे झालेलं दुर्लक्ष नुसतं लक्षात नाही आलं. तर फक्त गरजेपुरती स्वच्छता आणि जेवण, झोपण्यासाठी घराकडे बघणारे आपण त्या घराला सुंदर कराण्यासाठी प्रयत्न करु लागलो. घरकाम, स्वैपाक करणार्या बायकांना आपण गृहीत धरून चाललो होतो ती आपली केवढी मोठी सपोर्ट सिस्टीम आहे ते कळलं!आणि हे सगळं अनपेक्षित आलेल्या आरोग्यावरच्या संकटाला घाबरल्यावर कळलं,हे सुध्दा विचार करावा असंच आहे नाही का?
कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुक्त हे दोन्ही शब्द आपल्या सर्वांना शारीरिक, मानसिक, आर्थिकसुध्दा प्रचंड घाबरवणारे ठरलेत. कुठेतरी आपली चुकलेली जीवनशैली, रहाणीमानातला हरवलेला साधेपणा आपल्या स्वत:ला जाणवतोय! आजुबाजुच्या माणसांबरोबर निसर्गाकडे पण सजग दृष्टीने बघायला शिकल पाहिजे हे हा 'आजार' शिकवून जातोय. मजुरांची घराकडे जाण्याची ओढ, काही शेतकऱ्यांच्या मालाला न मिळणारी बाजारपेठ तर कुठे तरी होणारा काळाबाजार! प्रत्येक गोष्ट स्वत:च्या जगण्याचा शोध घ्यायला शिकवतेय.
पुन्हा एकदा सर्व संपवून आपण नव्यानं आयुष्याची सुरुवात करु तेव्हा मोठेपणाच्या भ्रामक कल्पनांसाठी धावणाऱ्या आपली ' जाणीवपूर्वक जगण्याची रेषा' मोठी व्हायला हवी. पुढच्या अनेक वर्षांसाठी हे अनुभव थोडं थांबून जगायला शिकवणारे व्हायला पाहिजेत.
तेव्हा सध्या तरी थांबलेली जगरहाट सुरू व्हायला कवींनी म्हटल्याप्रमाणे,
"बाहर की हवा है कातिल युं ही।
कातिल से उलझने की जरूरत क्या है।
घरी रहा,स्वस्थ रहा कारण निरोगी आरोग्य हेच खरं धन आहे.
वैशाख पौर्णिमा
ता. ७ मे २०२०
ललिता छेडा

Indeed it teaches us to take a respite from the rat race and give due respect to nature and learn to maintain its equilibrium . Also taught us to limit our needs , be tolerant and nurture our relationships.
ReplyDeleteIndeed it teaches us to take a respite from the rat race and give due respect to nature and learn to maintain its equilibrium . Also taught us to limit our needs , be tolerant and nurture our relationships.
ReplyDeleteCA Jayshree Karve
नेहमी प्रमाणे लिखाण छान.स्वतःच्या आजार पणाचा उल्लेख आहे सकारात्मक विचार करून त्यावर मात केली सगळ्या चे सहकार्य मिळाले. महत्वाचे घरचे डॉ. याच बरोबर निसर्गाच्या बरोबर वागा हा संदेश दिला धन्यवाद रागिणी
ReplyDeleteधन्यवाद तुम्हाला
ReplyDeleteछान!!
ReplyDelete