फाल्गुन महिन्यातली रंगपंचमीची उधळण चैत्रात निसर्ग आपलं सौंदर्य द्विगुणित करण्यासाठी वापरतो.मार्च महिना म्हणजे जसा वसंतोत्सव साजरा करण्याचा आणि ग्रीष्माच्या स्वागताचा असतो. ह्या महिन्यातला निसर्ग रंगीन मिजाजाचा असतोच. चैत्राच्या पालवीची इतकी मनोहर रूपं असतात की बघतच रहावीत. हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा ह्या पालवी फुटणार्या झाडांवर बघायला मिळतात.
डोंबिवली सिमेंटचं जंगल व्हायच्या आधी मी रहात असलेल्या रामनगरमध्ये खूप झाडं होती. माझ्या घराला लागून असलेला काटेसावर जानेवारीत पाच पाकळ्यांनी गर्दलाल रंगाच्या फुलांनी अगदी सजून जायचा. त्या झाडाचं नांव 'काटेसावर' आहे ते समोर रहाणाऱ्या भाग्यश्रीनी सांगितलं होतं. बाॅटनीची प्रोफेसर असल्याने ती नेहमी अशी झाडांबद्दल भरभरून बोलायची.
ते निष्पर्ण पण फुललेलं झाड चैत्र लागला की कोवळ्या पालवीन देखणं व्हायचं.कोपर्यावरचा पिंपळ कोवळ्या गुलाबी पालवीनं गहिरा होऊन जायचा! आमच्या घराशेजारी मोठं जांभळाचं झाड होतं मार्च महिन्यात त्या झाडावर पक्ष्यांच्या घरट्यांची बांधकामं सुरू होत असत. ती सगळी लगबग आमच्या खिडकीतूनप छान दिसायची. आता ती सगळी शोभा सिमेंटच्या जंगलात हरवून गेलीय.
. इथं थोडं दूर बंगल्यावर रहायला आल्यावर मात्र दारातली मधूमालती चैत्राची चाहूल लागल्याचं आपल्या झुलणार्या गुलाबी-पांढर्या झुबक्यांनी सांगू लागते.
चैत्र म्हटलं की माझ्या माहेरच्या चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाची आठवण आल्याशिवाय रहात नाही.माझा जन्म गिरगावातल्या चाळीत झाला पण सहाव्या वर्षांनंतरच बालपण, शिक्षण गिरणगांवातल्या परळ येथे गेलं. दोन्ही संस्कृती थोड्या भिन्न पण चाळसंस्कृती अगदी सारखी! परळच्या आमच्या घरासमोरच्या बिल्डींगमध्ये घराखालीच दुकानं असलेली गुजराती मंडळीं रहात होती. त्यांच्याशेजारच्या बिल्डींगमध्ये ज्यू आणि ख्रिश्चन मंडळी रहात होती. सुप्रसिद्ध अभिनेता डेव्हीड त्याच चाळीत रहात असे. माझ्या आईच्या एका ज्यु मैत्रिणीमुळे त्या चाळीत माझं येणं जाणं रोजच व्हायचं. ज्यु लोकांचं प्रार्थनास्थळ त्या चाळीत वरच्या मजल्यावर होतं. मावशीबरोबर त्या चर्च मध्ये सुध्दा मी गेल्याचं माझ्या आठवणीत आहे.आमच्या शेजारी बहूतांशी मुस्लीम वस्ती असलेली चाळ होती. त्यावेळी सर्वजण फारच गुण्यागोविंदाने नांदत होते.
अशा वातावरणामुळे मनावर बहुतेक जातीपातीच्या पलीकडचं माणूसपण जपण्याचे संस्कार झाले असावेत.
आमच्या घरात मात्र चैत्रातला गुढीपाडवा म्हणजे पूजेनंतर पंचागातल संवत्सर वाचन, जानवं बदलणं आणि महत्वाचं म्हणजे कढीलिंबाची चटणी खाणं हे सर्व ठरलेलं होतं. शाळेला सुट्टी आणि जेवणाचा मेनू श्रीखंड असायचा! श्रीखंड पुरी जामुळे दुपारी ताणून देणं आवश्यकच असायचं. संध्याकाळी कधी डोंबिवलीच्या आत्या, खारचा आतेभाऊ अशा मंडळींचं दादांच्या पाया पडायला येण व्हायचं. डोंबिवलीला आल्यावर शोभायात्रा, गुढी उभारणं हे सर्व गुढीपाडवा साजरा करण्यात महत्त्वाचं झालं.
तर आमच्या घरचं आई खूप हौसेने करायची ते चैत्रगोरीचं हळदीकुंकु, जे माझ्या आठवणीत एखाद्या फोटो अल्बम सारखं मी जपलय..
हळदीकुंकासाठी तिला मदत करायला आजी आदल्या दिवशी गिरगांवातून खास यायची.आणि आजी आली की मी खूश!
दरवर्षी गौरी साठी नवीन देखावा उभा करायची जबाबदारी माझी आणि दादांची( माझे वडील) कधी आमची चैत्रगौर जंगलात तर कधी झोपाळ्यावर कधी नौकेत अशी सजून बसायची.
डाळ-पन्ह्याच्या तयारीत आईची संपूर्ण सकाळ जायची. खलबत्त्यात डाळ कुटायची, पन्ह्यासाठीचा खटाटोप करायचा आणि मधून मधून आम्हाला सुचना द्यायच्या. आई दरवर्षी अगदी तितक्याच उत्साहानं हे सगळं आनंदानं करायची. आमची सजावट पूर्ण झाली की आई गौरीसमोर सुंदर रांगोळी काढायची. संध्याकाळी आमच्या चाळीतल्या बायका मोठ्या अप्रुपानी यायच्या. आईच्या परळ भगिनी मंडळाच्या मैत्रिणी, गिरगावातल्या मैत्रिणी, संध्याकाळ इतकी गडबडीत पण मजेत जायची की विचारुन सोय नाही.गंमत म्हणजे माझ्या आईनं शिवलेल्या दोन परकर-पोलक्याची पाळी ह्या हळदीकुंकवाच्या निमित्ताने यायची.दोन्ही दरवर्षी आलटून पालटून घालायचे.वयाबरोबर परकराची उंची खणाच्या कापडानी वाढायची. आताच्या ब्रॅन्डेडच्या काळात हे फार आउटडेटेड वाटेल पण मला मात्र त्या परकाराचे फलकारे मारताना कधीच लाज वगैरे वाटली नाही.आमच्या शेजारच्या गवाणकरांची नयना हौसेने हळदीकुंकु द्यायला यायची.माझं बघून तिच्या आईनं तिला खणाचा परकर पोलका शिवला होता.
चैत्रातला दुसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे 'रामनवमी'. दादा रामाचे परमभक्त त्यामुळे बरीच वर्षे त्यांचा रामनवमीचा कडक उपास असे. आमच्या देवघरात सुंदर पितळी राम पंचायतन होते. रामजन्म झाला की सुंठवडा खाऊन ते दिवसभर रहायचे.
रामनवमीच्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला. आम्ही रहात असलेल्या शेजारच्या राम मंदिरात रामजन्माचा सोहळा सुरू होता, रामजन्माबरोबर घंटानाद सुरू झाले आणि दादांनी आठ दिवसांनी डोळे उघडले. त्यांच्या तोंडात सुंठवडा घातला आणि ते रामाच्या भेटीला निघून गेले.
लग्नानंतर जैन मंडळींचा अक्षयतृतीया हा महत्त्वाचा दिवस! वर्षभर ज्यांनी उपास केले असतील त्यांचा उपास ह्या दिवशी सुटतो आणि नवीन वर्षीतप सुरू होतात. ह्या व्रतात वर्षभर एक दिवसाआड एकदाच जेवायचं असतं.
चैत्रात माझ्या आठवणीत रहाणारी जैन आयंबील उपासना! ती करायला माझ्या सासूबाई कायम डोंबिवलीत आमच्या घरी रहायला यायच्या.त्या आल्या की मला जैन धर्माच्या अनेक गोष्टी समजावून सांगायच्या.
मारवाडी सुन घरात आल्यावर चैत्रातल्या तीजेच्या सणाची माहिती मिळाली. ही पण गौरीचीच पुजा असते.
एकंदरीतच हा 'चैत्र' नवीन वर्षाच्या स्वागताचा, चैत्रगौर,तीज, अशा वेगवेगळ्या पध्दतीने गौरींच्या पुजेचा! त्याचबरोबर हळदीकुंकु, गौरी पुजन, सोनं लुटणं अशा पध्दतीने एकमेकांना भेटून नाती दृढ करणारा असतोच. त्याचबरोबर नव्या चैत्रपालवींन वसंतोत्सव साजरा करणार्या निसर्गाचाही असतो.
ह्या वर्षीच्याचैत्रात मात्र संपूर्ण जगाला 'कोरोना' नावाच्या काळ्या सावलींनं घेरलं आहे.पण हेही दिवस जातील अशा सकारात्मक विचारांनी प्रत्येकानं आलेल्या संकटाला सामोरं जायचंय.आरोग्यपूर्ण 'चैत्रपालवी' नक्कीच सर्वांच्याच आयुष्यात उमलणार आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदा
२५.३.२०२०
ललिता छेडा

छान। सासूबाई होत्या तोपर्यन्त आमच्याकडे सुद्धा चैत्र गौर सजायची।
ReplyDeleteगुढि पाडव्याच्या हार्दिक शुभेछा! लेखणिलाआलेला
ReplyDeleteबहर मोहकआहे
चैत्रपालवी या नावातच कथेची माडणी लक्षात येते. निसर्ग सौंदर्य वर्णन छान आहे
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteKhup chan katha.Mala athavtay mi tuzyakade haldikunkula aleli ahe.Lekhan khupach chan.
ReplyDeleteललिता,तुझी स्मरणशक्ती आणि निरीक्षण खूपच वाखाणण्याजोगे आहे अशीच लिहीत रहा.
ReplyDelete