डोळे उघडावे तरी उघडत नव्हते. शरीरभर वेदनेच्या पलिकडे काहीतरी पसरलं होतं. फक्त श्र्वास सुरू आहे म्हणून आपण जिवंत आहोत हे तिला जाणवत होतं.इतक्यात तिच्या डोक्यावरून हात फिरला."आजी" तिनं स्पर्श ओळखला होता.तिला उठून आजीच्या गळ्यात पडून जोराजोरात रडावसं वाटलं. पण शरीरभर असलेल्या नळ्या आणि ताकद नसलेल्या शरीरानी तिला साथ द्यायला नकार दिला होता.पण तिच्या नकळत डोळ्यांतून पाणी वाहू लागले. "रडू नकोस बायो, मी आहे ना! आजी रडत बोलत होती आणि लगेच नर्सनी तिला बाजूला करून डाॅक्टरांना हांक मारली. डाॅक्टर लगेच धावतच आले. " डाॅंक्टर, पेशंटच्या डोळ्यांतून पाणी येतंय.हातपण हलला"नर्स रिपोर्ट करत होती आणि डॉक्टर तिच्या डोळ्यात बॅटरीचा प्रकाश मारु लागले."आजी, तुमची नात थोडीशी शुध्दीवर येतेय". तुम्ही जरा बाहेर बसता,मला जरा तपासायला हवंय! डाॅक्टर आजीला समजावत होते." नको रे बाबा, मी इथे बसलेय ह्या कल्पनेनेसुध्दा तिला बरं वाटेल! तिलाही उठून डॉक्टरांना" आजी मला जवळ हवी आहे, तिचं नुसतं असणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे.असं सांगावस वाटलं!! पण ह्या सगळ्याचा परिणाम होऊन तिला धाप लागली. आणि नर्सनी आजीना बाहेर काढलं.
डाॅक्टर काहीतरी ट्रीटमेंट देत होते आणि तिलाही ग्लानी येऊ लागली होती. इतक्यात डाॅक्टर नर्सला म्हणाले" काल रात्री अॅडमिट झाल्यापासून जवळजवळ पंधरा सोळा तासांनी पेशंटनी रिस्पाॅन्स दिलाय. नशीबानं थोड्याच वेळात मंत्रीसाहेबही येताहेत. ते काय पेशंटचे वडील आहेत म्हणे" सावत्र वडील आहेत."नर्सनी लगेच उत्तर दिलं. ती त्याच गावातली असल्यानं नर्सला सगळंच माहित होतं.
तिची पुन्हा शुध्द हरपली होती.
बाहेर बसलेल्या आजींच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. त्यांच्या एकुलत्या एक लेकीची ही एकुलती एक मुलगी!
आजींच्या मुलीनं तिच्या पहिल्या नवर्याला सोडून आल्यावर गावातल्याच नगरसेवकाबरोबर लग्न केलं होतं.पुढे नवरा मंत्री झाल्यावर आजींची मुलगी मुंबईला निघून गेली होती आणि तिनं लेकीला आजींकडे सोडलं होतं.आजींना पण नंदिनीचा त्यांच्या नातीचा खूपच लळा होता.
काल काॅलेजला शहरात बसनी जाणारी नंदिनी रात्र झाली तरी आली नाही त्यामुळे काळजीनं आजी रात्रभर झोपल्या नव्हत्या. सकाळी कोणीतरी तिला गावातल्याच इस्पितळात दाखल केल्याच सांगत आलं आणि आजी धावतच तिथं पोचल्या. तिची अवस्था बघून काय झालं असेल त्याची अनुभवी आजींना पूर्ण कल्पना आली होती.सुदैवानं नव्यानंच सुरू झालेल्या गावातल्या अद्ययावत इस्पितळात शिकाऊ पण चांगला डॉक्टर जाॅईन झाला होता.
आजी उगीचच काहीतरी विचार करत होत्या.
डाॅक्टर खोलीतून बाहेर आले आणि आजींजवळ बसले.
"कोणी आणि कां केली ही अवस्था माझ्या सोन्यासारख्या पोरीची? आजी डॉक्टरांचा हात धरून विचारत होत्या.
" नाही हो माहित मला! पहाटे तिला कोणीतरी इस्पितळाच्या दारात ठेवून गेलं.अतिशय वाईट अवस्था होती तिची...आजी खूप धीरानं आपल्याला तिला बरं करायचंय,सर्वात पहिलं आपल्याला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करायला हवी. मी त्यादृष्टीनं सगळे कागद तयार करतो. आजी खूप मोठी लढाई लढायचीय आपल्याला" डॉक्टर आजींना समजावत होते.
" खूप धीराची आहे रे मी, पण हिची अवस्था बघवत नाहीये, ही बरी व्हायला हवी! आजींना रडू आवरत नव्हतं.
हळूहळू गावातली मंडळी जमा व्हायला लागली होती. पोलीसांच्या चकरा पण सुरू झाल्या होत्या.कोणीतरी नंदिनीला सरपंचाच्या मुलाबरोबर गावातल्या देवीच्या देवळाकडे जाताना बघितल्याचं बोललं.आणि तपासाची चक्रे फिरू लागली.
आता नंदिनीला पुन्हा जाग येत होती.तिनं डोळे उघडले आणि नर्सनी ते बघितलं. आनंदानं तिनी डाॅक्टरांना हांक मारली. आजी,डाॅक्टर सगळेच धावत आले. तिच्या डोक्यावर हात ठेवून " कळतंय मी काय बोलतोय ते? असं डॉ.नी विचारल्यावर नंदिनीनी मान हलवली. व्वा,आता काही विचार करु नकोस, लवकर बरं व्हायचंय ना आपल्याला! इतक्यात बाहेर कसली तरी गडबड झाली डॉक्टर लगेच बाहेर गेले.
बाहेर मंत्रीमहोदय त्यांच्या बायकोबरोबर गाडीतून उतरत होते. नंदिनीची आई कोणाशीही न बोलता नंदिनीच्या खोलीत गेली. तिला बघून नंदिनींनी डोळे मिटून घेतले. तिला आत्ता कोणाशीही बोलायचं नव्हतं.
नंदिनीला आईला बघितल्यावर ६/७ वर्षांपूर्वी मुंबईला आईकडे गेलो होतो तेव्हा निर्भयासाठी आपण आईबरोबर जाऊन मेणबत्त्या लावल्या होत्या त्यांची आठवण झाली.त्यावेळी लावलेल्या मेणबत्त्यांचा अर्थ कळलाच नव्हता पण आज इतक्या वाईट पद्धतीनं तो अर्थ कळतोय आणि त्यातला फोलपणा पण कळतोय ते सर्व आठवून नंदिनीला उन्मळून रडायला आलं.
"नको ना रडू, आम्ही आहोत तुझ्याबरोबर" आई बोलत होती तिनं आईकडे अगतिकपणे बघितलं.
पण आई, जेव्हा माझ्या शरीराची विटंबना होत होती तेव्हा तर माझ्याबरोबर कोणीच नव्हतं ना!अगदी तुझा परमेश्वरसुध्दा...तिचा आतल्याआत आक्रोश सुरू होता.
मंत्री आल्यामुळे असेल किंवा ती शुद्धीवर आली आहे हे कळल्यामुळे असेल पोलिस इन्सपेक्टर पण आईच्या मागोमाग आले.त्यांच्याबरोबर डॉ.पण होतेच. आत आल्यावर डाॅक्टरांनी "पेशंट अजिबात बोलण्याच्या स्थितीत नाही प्लीज कोणीही तसा प्रयत्नही करु नका" असं म्हटलं.
"डाॅक्टर, पेशंट थोडासा शुध्दीवर येईल तर मला लगेच बोलवा. आमचा एक पोलिस इथं खोलीबाहेर बसेल"इन्सपेक्टर थोड्या कडक आवाजात म्हणाला.
नंदिनीची तब्येत मात्र दिवसेंदिवस बिघडतच होती. पण तिनं सरपंचाच्या मुलांनी जगननी "आजींनी तुला देवळात बोलावलंय असं खोटं सांगून" बस स्टॅण्ड वरुन देवळाच्या मागील बाजूस नेऊन मित्रांच्या ताब्यात दिलं आणि स्वत: पळून गेला. त्यातील मुंबईहून आलेल्या मित्रांनी बलात्कार केला असल्याचे सांगितले. पण सांगायच्या आधी मी हे सगळं फक्त आजीला सांगेन अशी अट घातली. तिनं सांगितल्यामुळे गुन्हेगारांना पकडलं गेलं.आजी एक क्षणसुध्दा तिला स्वत: पासून दूर ठेवत नव्हत्या.
मंत्र्यांच्या पत्रकार परिषदा सुरू होत्या.दुर्दैवानं तिच्या खोलीच्या मागेच इस्पितळाची कन्सल्टिंग रूम होती.आणि मंत्रीमहोदयांचा मुक्काम तिथेच होता. " आमच्या विरोधकांनी हे केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असली वाक्यं ऐकून दोन दिवसांनी आजींनी त्यांना हात जोडून मुंबईला जायचची विनंती केली. ते देखील लगेच गेले. आई मात्र मनापासून केस व्हावी ह्यासाठी धावपळ करत होती.
" आजी, तुमच्या नातीला जगण्याची इच्छाच उरली नाहीय! मी उत्तम उपचार करतोय पण ती रिस्पाॅन्सच देत नाहीय! डाॅ. हताशपणे एका सकाळी म्हणाले आणि आजी "असं नको म्हणूस पहिल्या दिवशी तूच मला लढाईला तयार केलंस ना आणि आता असा हरू नकोस.त्याचा हात धरून म्हणाल्या. पण दोघांनाही भविष्य कळलं होतं. जड पावलांनी दोघं नंदिनीच्या खोलीत आले. नंदिनी जोराजोरात श्र्वास घेत होती. तिला and सपोर्ट सिस्टीम लावायची तयारी सुरू होती.
"काय शिक्षा देणार असं वागणार्या शैतानांना? आणि त्यांना मिळालेली कोणतीही शिक्षा ह्या मुलींना न्याय देवूच शकत नाही. पण आजीचा सात्त्विक संताप नंदिनी पर्यंत पोचतच नव्हता. तिनं दु:खानी घेतलेला मोठा श्र्वास बाहेर सोडलाच नाही. बळींच्या संख्येत अजून एकानी वाढ झाली. गावात मेणबत्त्या लावल्या गेल्या.
थोड्याच दिवसात गावातली अस्वस्थता संपून परिस्थिती पूर्वपदावर आली.फक्त नंदिनीचा विषय निघाला की सगळेजण हळहळतात.
पण भय मात्र इथलं संपत नाही...
ललिता छेडा.
.

आजची सामाजिक परिस्थितीचे ह्रदयाला भेडणारे वास्तव आहे.
ReplyDeleteदोन्ही कथांमध्ये विचार चांगले मांडले आहे
ReplyDelete