आठवणीतली प्रवास गाथा...
सहज वाचनात आलं की २७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन असतो. ते वाचल्यावर शरीरापेक्षा मनच जास्त प्रवास करु लागलं आणि केलेले देश-विदेशातले प्रवास एखाद्या चलचित्राप्रमाणे डोळ्यासमोर सरकून गेले.पण जास्त आठवले लहानपणी केलेले प्रवास!
त्याकाळी मे महिन्याची सुट्टी लागली की फलटणला आत्याकडे आणि सांगलीला आजोळी जायचं नक्की असायचं. सगळे प्रवास अर्थात एस.टी.नी व्हायचे. मला एसटी खूप लागायची त्यामुळे माझा संपूर्ण प्रवास आईच्या मांडीवर झोपूनच व्हायचा. आता विचार करता मनात येतं' 'आठ तास मला मांडीवर घेऊन आईला किती अवघडून जात असेल' पण एकदाही तिनं तसं मला जाणवून सुध्दा दिलं नाही.आपण आई झालो की आपली आई आपल्याला उमगायला लागते.
गावाला जायचं ठरवलं की आमची एक लाल बॅग होती.ज्यात माझे आणि दादांचे(माझे वडील) कपडे भरले जायचे,एक छोटासा आईनं घरी शिवलेला होल्डाॅल असायचा ज्यात आईच्या चार नऊवारी साड्या,इतर काहीबाही बांधलं जायचं.एक घरीच शिवलेली चेक्सचं डिझाईन असलेली पिवळ्या रंगाची कप्प्यांची पिशवी होती.ज्यात प्रवासात लागणारी सामग्री भरली जायची.कुठेही जायचं तर आमचं सामान हेच...
आज फोर व्हीलर मधून फोर व्हीलची बॅग घेऊन वीक एण्डला औटींगला जाणाऱ्यांना ही वर्षातून एकदा गावाला जाण्याची गंमत कळणारच नाही.
उन्हाळ्याची सुट्टी लागली की फलटणला सर्वात पहिलं जायचं.हा अलिखित नियम होता.दादांची प्रत्येक गोष्ट शिस्तीत आणि आखीवरेखीव असायची.त्यामुळे महिनाभर आधीपासून पत्रव्यवहार व्हायचा.कुठे किती दिवस रहायचं, किती खर्च येईल हे सर्व आधी लिहून तयार असायचं.
फलटणला पोचलो की आत्या दारात भाकरतुकडा ओवाळून टाकायची. इतकं छान वाटायचं जणू प्रवासाचा शीण काढून ती दाराबाहेर घालवतेय.
फलटणचे दिवस पटकन संपायचे. आत्याचा वाडा मोठा होता.दिंडी दरवाजातून आत आलं की डाव्या बाजूला दिवाणखाना, समोर पडवी,माजघर, झोपाळ्याची खोली,झोपाळ्यासमोर देवघर!देवघराच्या बाजूला स्वैपाकघर, झोपाळ्याच्या मागे तुळशीचं अंगण जिथे एक छोटीशी बाग!! संध्याकाळी त्या झाडांना पाणी घालायचं,आत्या मग तुळशीवृंदावनाशी दिवा लावून आरती म्हणायची.इतक्या आरती असताना ती एकच आरती म्हणायची"आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा" इतकं प्रसन्न वाटायचं! जितकी प्रसन्न संध्याकाळ तितकीच सुंदर सकाळ दोन्ही अंगणात सडा घालायचा,बंब पेटवणाऱ्या आतेभावाशी उगीच वाद घालायचा, चहा पिताना वर्तमानपत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या आत्याला वाचून दाखवणारे आत्याचे यजमान भाऊसाहेब!ते इतकं समजावून सांगायचे की हातानं काम करत असले तरी सर्वांचे कान मात्र भाऊ आणि आत्याच्या संवादाकडे असायचे. कारण आत्या अगदी तन्मयतेने त्या बातम्या ऐकायची. त्यानंतर शेजारच्या नानाई भाजी निवडून द्यायला यायच्या,त्यांचा मुलगा नाना म्हणजे आत्याच्या घरचा' नारायण'च होता.
आत्याचं दुसरं बिऱ्हाड दातिरांच, त्यांच्या तीन मुली माझ्या वयाच्या आणि एक थोडी लहान.त्यामुळे माझी सगळी दुपार त्यांच्या घरात जायची.मी सागरगोटे,टिक्कर तिथेच शिकले. आज साठ वर्ष झाली पण सगळ्या आठवणी लखलखीत आठवतात.कारण ह्या आठवणी मनात खोलवर जपल्या गेल्यात.
फलटणच्या दिवसात तिथलं रामाचं मंदिर,आत्याच्या सासरचं घर, आठवडयाचा बाजार हे सगळं व्हायचंच.
सांगलीला मात्र दादांच्या पांच मामांच एकत्र कुटुंब! माझ्या आजीच्या मृत्यूनंतर दादा सांगलीला
मामांकडे आले आणि खाडिलकरांच्या घरच्या मोठ्या भावाचा मान सर्वानींच त्यांना दिला.तो सांगलीचा वाडा एखाद्या सिनेमा सारखा होता.खूप कॅरेक्टरस्! प्रत्येकाचं एक वेगळेपण आणि ते जपण्यासाठी त्या प्रत्येकाची धडपड सुरू असायची.ह्या पांच भावांच्या तीन बहिणी,त्यातली एक माझी आजी, आणि दुसर्या दोघीतली एक पुन्हा एकदा सिनेमातल्या पाॅवरफूल नणंदेसारखी कमरेला किल्ल्या असणारी!! सगळ्या घरावर हिचं वर्चस्व आहे असं समजणारी.कारण मोठ्या दादामामांच्या पत्नीच्या निधनानंतर त्यांची मुलं आणि एका दिव्यांग मुलीची जबाबदारी बालविधवा असलेल्या ह्या बहिणीनी उचलली होती. तिचं वेगळेपण म्हणजे बोलताना 'माणूस" ह्या शब्दाला जमतील तेवढे विभक्ती प्रत्यय ती लावायची.हे सगळं तेव्हा कळत नव्हतं पण नंतर हळूहळू कळू लागलं.पण आज मागे वळून पाहताना वाटतं " स्वत:च असं कोणी नसताना भावाचा संसार आपला मानून चालताना कदाचित तिच्या हातून काही चुका झाल्या असू शकतील. आता त्या विसरायला हव्यात.तिची माझ्या लक्षात राह्यलेली एक आठवण म्हणजे "माझ्या एका काकूला तिनं हाक मारली. काकू विहीरीवर पाणी भरत होती. तिला बहुतेक ऐकून आलं नसावं, हिने रागाने जोरात हांक मारून म्हटलं" निर्मला, लगेच हातातलं काम टाकून ये" काकूंच्या हातात भरलेली घागर होती, तिनं दिली सोडुन विहीरीत! मोठा आवाज झाला आणि सर्वांना वाटलं काकू पडली की काय? दुसऱ्याच मिनीटात काकू तिच्या समोर उभी राहून विचारतं होती"बोला, काय काम आहे? लगेच सगळ्यांना कळलं काकूंनी काय केलंय ते!! अजूनही काकूंचा तो स्थितप्रज्ञ चेहरा डोळ्यासमोर आहे.
सांगलीच्या घरातली माझी लाडकी आजी म्हणजे दादांच्या मामी आणि जुन्या जमान्यातल्या सुप्रसिद्ध गायिका इंदिराबाई खाडिलकर ह्या होत्या. त्यांचं हळूवार बोलणं, गाणं गुणगुणं खूप छान वाटायचं.
सांगलीच्या घरातलं दादांच्या गोष्टी सांगणं हा एक सर्वाचाच रात्रीचा आवडता कार्यक्रम असायचा. रोज एकदा तरी"तिच ग मी" ही गोष्ट व्हायचीच. आणि प्रत्येकवेळी नव्यानं मुलांनी घाबरलं पाहिजे ही दादांची जबाबदारी असायची. आणि ते ती मस्त पार पाडायचे. सांगलीच्या घरातल्या स्वैपाकघरांत भाकऱ्या करणाऱ्या उमामामी अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत. सांगलीहून अनेकदा मिरज,उगार, रहिमतपूर असं जायचं असायचंच अर्थात लोकल किंवा ट्रेननीच हा प्रवास व्हायचा.
ह्या सगळ्या प्रवासांनी मला नातं जपायला शिकवलं!
आठवणीतल्या प्रवासातला एक म्हणजे महाबळेश्वरच्या एम.टी.डी.सी.त माझ्या इंदूआत्यानी एक महिन्यासाठी रूम घेतली होती. आणि आम्हाला बोलावलं होतं तो .त्याकाळी स्वत:पूरता आनंद घ्यायचा असं नसायचं. सर्वजण त्या आनंदात सहभागी व्हावे असं वाटायचं. आणि म्हणूनच त्या महिन्यात आत्याच्या यजमानांनी बऱ्याचजणांना महाबळेश्वरला बोलावलं होतं.
तिथल्या वास्तव्यातल्या दोन गोष्टी मला कायम आठवतात एक म्हणजे आईला त्या चार दिवसांत आयतं जेवण मिळालं ह्याचं खूप अप्रुप वाटलं होतं.आणि हे ती परत आल्यावर बरेच दिवस सर्वांना सांगत होती.आणि दुसरं म्हणजे आम्ही प्रतापगडावर जायचं ठरवलं आणि मला आदल्या रात्री खूप ताप आला.वरती जाण्यासाठी कडेवर उचलून घ्यायला दहा-बारा रूपये देऊन बाई ठरवली. पण मी तिला हात सुद्धा लावून दिला नाही. आणि गड मी दादांच्या किंवा आत्याच्या यजमानांनाच्या कडेवर बसून,कधी दोन्ही आतेभावांनी बखोटीला धरून झोपाळा करत वरती चढले. आणि उतरताना मात्र मी आपली आपली उतरले. घरी आल्यावर त्या बाईला दिलेले पैसे कसे फुकट गेले ह्यावर चर्चा सुरू झाली आणि आत्याचे यजमान अगदी सहज म्हणाले" ती आजारी असताना सुध्दा प्रतापगडावर चढून गेली.हे महत्त्वाचं आहे तेव्हा ह्यावर चर्चा नका करू... नकळतपणे होणारे संस्कार असे होतात.मी अजूनही ते वाक्य विसरले नाही.
त्यानंतर प्रवास खूप झाले पण सहजीवन शिकवणारे,नाती जपणारे प्रवास हे फक्त लहानपणीच झाले असं मनापासून वाटतं.म्हणूनच...
माझं हरवलेलं बालपण पुन्हा एकदा जगायला लावणारी...
अशी ही माझी आठवणीतली प्रवास गाथा...
- ललिता छेडा.

किती सुरेख लिहिता! मनावरनंअलगद मोरपीस फिरलं !!
ReplyDeleteमनातलं मनापासून आहे ना!
ReplyDeleteआठवणी ला उजाळा दिलात तुमच्या. मन भुतकाळात गेले पण आपण जे जपले त्यात खूपच आनंद वाटत असतो. मांडणी चांगली केली.
ReplyDeleteस्वतः बरोबर आमच्याही आठवणी ना उजाळा दिलास.फारच सुंदर लिहिले आहेस.
ReplyDeleteChaan...
ReplyDelete