Thursday, September 5, 2019

पाऊलखुणा



नवीन ब्लाॅग लिहायचे तर ललित लेखच लिहावेत असं मनात आलं. कथा लिहीताना खूप कल्पना विलास असतो. संवाद असतात. पण ललित लेखनात मात्र विषयाचा धागा पकडून त्याला भाषेचं सौंदर्य, स्वत:चे अनुभव, विचार ह्या सगळ्यानी वाचनीय करण्याची जबाबदारी असते.

एक मात्र वेगळं आहे की कथेच्या माध्यमातून कल्पनेतल्या माणसांना रंगवलं आता आयुष्याच्या वाटेवर भेटलेल्या माणसांना, अनुभवांना लेखनातून पुन्हा एकदा अधिक समजून घ्यायचा प्रयत्न करायचाय. कदाचित माणसं नव्यानं कळतील!

ह्यासाठी मराठी महिने आणि त्यानिमित्ताने येणारे सणवार हा एका लेखाचा विषय असेल आणि दुसरा लेख त्या महिन्यातल्या खास दिवसांविषयी असेल. ह्या सगळ्या पाऊलखुणा आहेत. ज्यांच्याकडे मागे वळून पहायचंय आणि पूढे जाताना चांगल्या उमटतील असंही पहायचंय!

अर्थात ह्यासर्वासाठी वाचकांच्या प्रतिक्रिया, शुभेच्छांची आवश्यकता आहेच.

- ललिता छेडा.


4 comments:

  1. शुभेच्छा💐.उत्सुकता वाढली. छान सुरुवात

    ReplyDelete
  2. नविन कल्पना छान आहे. खूप खूप शुभेच्छा आम्ही वाट पहात आहे.नविन वाचायला मिळेल.

    ReplyDelete
  3. खूप छान कल्पना !! वाट पाहू !

    ReplyDelete
  4. Best wishes for your journey🌷🌷👍

    ReplyDelete